औरंगाबाद - सभा होत असताना अंगावर गुन्हे दाखल झाले तरी तयार आहे, असे मत अमित ठाकरे ( Amit Thackeray inspects Raj Thackeray rally place ) यांनी व्यक्त केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी मनसेचे दिग्गज नेते शहरात दाखल झाले आहेत. त्यात अमित ठाकरे ( Amit Thackeray at Sanskrutik Krida Mandal ) यांचे शहरात आगमन झाले असून, त्यांनी सभा ठिकाण असलेल्या सांस्कृतिक क्रीडा मंडळ ( Amit Thackeray news Aurangabad ) येथे पाहणी केली. उत्तम काम झाले असून चांगली सभा होईल, असा विश्वास अमित ठाकरे ( Amit Thackeray at Cultural Sports Circle Aurangabad ) यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - Imtiyaz Jaleel Aurangabad : 'राज ठाकरे यांनी सभेच्या आधी आमच्यासोबत इफ्तार पार्टीला यावे'
शहरात बॅनर बाजी - मनसे तर्फे सभेचे साक्षीदार व्हा, असे बॅनर झळकवण्यात आले. मात्र, त्याच्या बाजूला शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट एकच असल्याचे बॅनर लावले. त्यावर शहरात जोरदार चर्चा रंगली असताना, बॅनर कोणी काही लावू द्या, लोकांच्या मनात काय आहे हे महत्वाचे आहे, असे मत अमित ठाकरे यांनी व्यक्त केले. तर, मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी आम्ही त्यांच्यासोबत तुलना करत नाही, कारण राज ठाकरे यांना हिंदू जननायक, असे म्हणतो, असे त्यांनी सांगितले.
मनसे नेते तळ ठोकून - 1 मे च्या सभेची जय्यत तयारी होत असून, त्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. सांस्कृतिक मैदानात पोलिसांनी सीसीटीव्ही लावले असून, जवळपास अडीच हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात असणार आहेत. तर, मनसेचे बडे नेते शहरात तळ ठोकून आहेत.
राज ठाकरे काय बोलणार? याकडे लक्ष - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 1 मे ला औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेत काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. बेकायदेशीररित्या मशिदीवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांचा मुद्दा राज ठाकरे यांनी उचलून धरला आहे. हे भोंगे राज्य सरकारने उतरवले नाही तर त्याच मशिदीसमोर भोंग्यांवर हनुमान चालीसा पठण केले जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळेच, औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेमध्ये राज ठाकरे आता काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
हेही वाचा - वृद्धाला भाड्याच्या घरात सोडून नातेवाईक फरार; परिसरातील नागरिकांनी केला सांभाळ