ETV Bharat / city

अखिल भारतीय साहित्य संमेलन ऑनलाइन होणार नाही, कौतीकराव ठाले पाटील यांचे स्पष्टीकरण

साहित्य संमेलन कधी होणार याबाबत कुठलीही तारीख अंतिम झाली नाही. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यावर आणि सरकारने संमेलनासाठी परवानगी दिल्यावरच हे संमेलन होईल. संमेलन ऑनलाइन घेण्याची मागणी होती. मात्र, संमेलन लोकांसाठी आहे. त्यात प्रत्येकाला सहभाग घेता आला पाहिजे. कोरोणामुळे मागील दीड वर्षांपासून पुस्तक विक्री कमी झाली आहे. संमेलन प्रत्यक्ष झाले, तर पुस्तक विक्री देखील होते. त्यामुळे संमेलन ऑनलाइन होणार नाही, असे महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. ते औरंगाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील

author img

By

Published : Aug 3, 2021, 8:38 PM IST

औरंगाबाद - यंदाचे 94 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिकला होणार होते. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे ते पुढे ढकलण्यात आले. हे संमेलन आता कधी होणार हा प्रश्न अजूनही अधांतरीच आहे. आज औरंगाबादेत अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि नाशिकच्या स्वागत मंडळाचे पदाधिकारी यांची बैठक झाली यामध्ये साहित्य संमेलन नाशिकला होणार असले, तरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत संमेलन होणार नाही, तसेच ते ऑनलाइन पद्धतीने होणार नाही, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांनी दिली. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील, औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलताना

'आठ ऑगस्ट रोजी होणार बैठक'

साहित्य संमेलन नाशिकलाच होणार आहे. मात्र, ते कधी होणार, याबाबत 8 ऑगस्टला साहित्य महामंडळाच्या 15 पदाधिकाऱ्यांची एक बैठक होईल. त्या बैठकीत प्रादुर्भाव कमी झाल्याशिवाय संमेलन होणार नाही अशी भूमिका आम्ही मांडणार आहोत, अशी माहिती महामंडळाच्या अध्यक्षांनी दिली आहे. त्यानंतर नक्की संमेलन कधी होणार, याबाबत विचार करू. मात्र, तूर्तास तरी प्रादुर्भाव कमी झाल्याशिवाय संमेलन होणार नाही असे स्पष्ट महामंडळाने केले आहे. त्यामुळे संमेलनाची तारीख अजूनही अधांतरीच असल्याचे आपल्याला म्हणता येईल. तर, ऑगस्ट महिन्यात आढावा घेऊ आणि नंतरच संमेलनाची तारीखीबाबत ठरवू, अशी माहिती नाशिकच्या लोकहितवादी मंडळाने दिली आहे.

'संमेलन ऑनलाइन नाहीच'

साहित्य संमेलन कधी होणार याबाबत कुठलीही तारीख अंतिम झाली नाही. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यावर आणि सरकारने संमेलनासाठी परवानगी दिल्यावरच हे संमेलन होईल. संमेलन ऑनलाइन घेण्याची मागणी होती. मात्र, संमेलन लोकांसाठी आहे. त्यात प्रत्येकाला सहभाग घेता आला पाहिजे. कोरोणामुळे मागील दीड वर्षांपासून पुस्तक विक्री कमी झाली आहे. संमेलन प्रत्यक्ष झाले, तर पुस्तक विक्री देखील होते. त्यामुळे संमेलन ऑनलाइन होणार नाही, असे महामंडळाचे अध्यक्ष कौतीकराव ठाले पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.