ETV Bharat / city

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात अंदाजे 4 हजार कोटींचे नुकसान- अजित पवार

पॅकेज जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्रीस्तरावर निर्णय होईल. पीक कर्ज फेडणे शेतकऱ्यांना शक्य नाही. त्यामुळे कर्जाचे पुनर्गठन करावे लागेल. मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याच्या अर्थमंत्र्यांनी दिली आहे.

अजित पवार
अजित पवार
author img

By

Published : Oct 10, 2021, 12:53 AM IST

Updated : Oct 10, 2021, 1:31 AM IST

औरंगाबाद - अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात 48 लाख हेक्टरपैकी 32 ते 36 लाख हेक्टरहून अधिक नुकसान झाल्याच्या प्राथमिक आकडा आहे. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे 4 हजार कोटींची नुकसान प्राथमिक अंदाज असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये बैठक झाली आहे. राज्याने पीक कर्जाचा हजार कोटींचा हप्ता दिल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. त्याबाबत बैठक घेण्यात आली. काही जणांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. ओल्या दुष्काळाचा निर्णय मुख्यमंत्रीस्तरावर होईल. याबाबत मी मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार आहे. वेळप्रसंगी कर्ज काढू, पण मराठवाड्याच्या आणि राज्यातील कुठल्याच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा-राहुल गांधींची इच्छा नसेल तर काँग्रेसचे अध्यक्षपद प्रियंका गांधींनी स्वीकारावे, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याची इच्छा

सरसकट सगळ्या पंचनाम्यांची वाट पाहण्याची गरज नाही-
राज्याने अतिवृष्टीबाबत अहवाल दिला नसल्याने केंद्र सरकार मदत कशी करणार अशी माहिती केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी दिली. मात्र, एनडीआरएफचे निकष सगळीकडे सारखे असतात. पंचनामे झालेल्या ठिकाणांची माहिती मंत्रालयात आल्यानंतर मदत करण्यात येईल. सरसकट सगळ्या पंचनाम्यांची वाट पाहण्याची गरज नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. एनडीआरएफच्या निकषानुसार काम सुरू आहे. मुखमंत्र्यांना सोमवारी याबाबत अहवाल देणार आहेत. त्यावर मुखमंत्र्यांसोबत सोबत चर्चा होईल, असेदेखील अजित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा-शाहरुख खानच्या वाहन चालकाला 'एनसीबी'चे समन्स, चालक चौकशीसाठी कार्यालयात हजर

कर्जाचे पुनर्गठन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून निर्णय होईल-
अकृषिक नुकसान पोटी 550 कोटी तर कृषी साठी 350 कोटी आधीच दिले आहेत. पावसात रस्ते व पूल सगळे वाहून गेले आहे. तलाव फुटून वाहून गेले आहेत. नुकसानीचा पूर्ण अंदाज आलेला नाही. मात्र, यंत्रणा काम करत आहे. पीक विम्याचे पैसे आम्ही सोडले आहे. केंद्राने आता सोडावे. काही ठिकाणी आम्ही अडवले हे सत्य आहे. मात्र जुने पैसे अजून आले नाही म्हणून थांबवून ठेवले आहे. पॅकेज जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्रीस्तरावर निर्णय होईल. पीक कर्ज फेडणे शेतकऱ्यांना शक्य नाही. त्यामुळे कर्जाचे पुनर्गठन करावे लागेल. मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याच्या अर्थमंत्र्यांनी दिली.

हेही वाचा-इम्तियाज खत्रीला पुन्हा सोमवारी हजर होण्याचे एनसीबीचे समन्स; तर आणखी एका ड्रग पेडलरला अटक

Last Updated : Oct 10, 2021, 1:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.