औरंगाबाद - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी साकडे घातलेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी देखील दर्शन घेतले. वैजापूर येथून येत असताना दौलताबाद येथे जाऊन त्यांनी दर्शन घेतले. त्यामुळे, खैरे यांच्या भक्तीला आदित्य ठाकरे यांची साथ असल्याच बोलले जात आहे.
हेही वाचा - Aditya Thackeray Aurangabad Visit: बंडखोर आमदार विरोधात आदित्य ठाकरे करणार सेनेचे शक्तिप्रदर्शन
पक्षाच्या बचावासाठी देवाकडे धाव - सेना नेते चंद्रकांत खैरे यांची देवावरील श्रद्धा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. त्यात राज्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे सेनेत मोठी फूट पडली असून पक्षाचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, खैरे यांनी संकटमोचक मारुतीकडे धाव घेतली होती. दौलताबाद येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आठ तास मौनव्रत धारण करून पूजा केली. पक्षावरील संकट जाऊ दे, उद्धव ठाकरे यांच्या समोर असणाऱ्या अडचणी दूर होऊ दे असे साकडे त्यांनी घातले.
आदित्य ठाकरे यांचे देवदर्शन - शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची देवावर निष्ठा आहे. त्यामुळे, त्यांनी आवर्जून आदित्य ठाकरे यांच्यावरील संकट दूर व्हावीत याकरिता त्यांना देवांच्या चरणी नेले. देवाचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असावेत म्हणून त्यांना खुलताबाद येथील भद्रा मारोती मंदिरात, तर नंतर दौलताबाद येथील दक्षिणमुखी मंदिरात दर्शनासाठी नेले. वैजापूर औरंगाबाद रस्त्यावर त्यासाठी विशेष भेट काढण्यात आली. आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे देवाची साथ असेल, अशी भावना चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - Aaditya Thackeray : औरंगाबादेत आदित्य ठाकरेंची तोफ बंडखोरांवर धडालली; 'सगळे नीट चालले असताना गद्दारी का'