औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेचे ४२ वे मराठवाडा साहित्य संमेलन (Marathwada Sahitya Sammelan) डिसेंबर महिन्यात तिसऱ्या आठवड्याच्या शनिवार आणि रविवारी घनसावंगी (Ghansawangi ) येथे घेण्यात येईल, अशी माहिती परिषदेतर्फे जाहीर करण्यात आली.
हे संमेलन घेण्यासाठी घनसावंगी येथील स्वामी रामानंदतीर्थ शिक्षण प्रसारक मंडळाने मराठवाडा साहित्य परिषदेला निमंत्रण दिले होते. हे निमंत्रण कार्यकारणीच्या वतीने अध्यक्षांनी स्वीकारले आहे. स्वामी रामानंद तीर्थ संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव चोथे यांना परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी साहित्य परिषदेच्या वतीने पत्र पाठविले आहे.
४२ वे मराठवाडा साहित्य संमेलन डिसेंबर २०२२ च्या तिसऱ्या आठवड्यातील शनिवारी व रविवारी जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे घेण्यात येईल, असे परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी स्वामी रामानंद तीर्थ शिक्षण प्रसारक मंडळाला कळविले आहे. लवकरच मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीतील अध्यक्षांची निवड जाहीर करण्यात येईल आणि तसे निमंत्रक संस्थेला कळविण्यात येईल, असेही कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्राद्वारे सांगितले. यावेळी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. किरण सगर, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे आणि कार्यकारिणीचे सदस्य डॉ. रामचंद्र काळुंखे आणि जीवन कुलकर्णी हे उपस्थित होते.
हेही वाचा : आजची प्रेरणा : दिवसाची सुरुवात करा गीतेतील प्रेरक विचारांनी