ETV Bharat / city

4 वर्षाच्या चिमुकल्याने केली कोरोनासह हृदयरोगावर मात - ताज्या बातम्या मराठी

प्रचंड इच्छा शक्ती आणि संकटावर मात करण्याची इच्छा असेल तर मृत्यूवर देखील विजय मिळवता येतो, असे अनेक उदाहरण पहावयास मिळतात. अशीच एक घटना सिल्लोड मध्ये घडली आहे. सिल्लोड येथील चार वर्षीय नक्ष या चिमुरड्याला कोरोनाची लागण झाली होती.

4 वर्षाच्या चिमुकल्याने केली कोरोना हृदयरोगावर मात

author img

By

Published : May 1, 2021, 4:44 PM IST

औरंगाबाद (सिल्लोड) - प्रचंड इच्छाशक्ती आणि संकटावर मात करण्याची इच्छा असेल तर मृत्यूवर देखील विजय मिळवता येतो, असे अनेक उदाहरण पहावयास मिळतात. अशीच एक घटना सिल्लोडमध्ये घडली आहे. सिल्लोड येथील चार वर्षीय नक्ष या चिमुरड्याला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनामुळे त्याच्या हृदयाभोवती पाणी झाल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक बनली. यासाठी नक्षला त्वरित रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज भासली. मात्र त्यावेळी जिल्ह्यात रेमडेसिवीरचा तुटवडा होता. आशावेळी आपल्याला रेमडेसिवीर मिळेल की नाही, ही चिंता निर्माण झाली. नक्षचे वडील डॉ. शेखर दौड यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना याबाबत कळविले. अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकारी यांना संपर्क साधून वेळेत रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवून दिले. " जागो राखो साईया, मार सखे ना कोई " या प्रमाणे हळूहळू नक्षच्या प्रकृतीत सुधारणा होऊन शुक्रवारी नक्षला डिस्चार्ज मिळाल्याने नक्षचे वडील डॉ. शेखर दौड यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार व नक्षवर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे आभार मानले आहे.

इच्छाशक्तीने कोरोनाला हरवले!
सिल्लोड येथील मातोश्री हॉस्पिटलचे डॉ. शेखर दौड यांच्या 8 महिने गर्भवती पत्नी डॉ. वैशाली दौड व 4 वर्षाचा मुलगा चि. नक्ष हे दोघे दि. 18 एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आले होते. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ते घरी उपचार घेत होते. परंतु दिनांक 23 एप्रिल रोजी नक्षच्या हृदयाचे ठोके खूप वाढून अनियंत्रित झाल्यामुळे तब्येत अचानक बिघडली. तात्काळ औरंगाबाद येथील निमाई हॉस्पिटलमध्ये हलवले असता तेथील डॉ. संतोष मुद्रेवार यांनी नक्ष याला कोरोनामुळे हृदयाला गंभीर सूज येऊन हृदयाभोवती पाणी झाल्याचे निदान केले व प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले. बाल हृदगरोग चिकित्सक डॉ. दीपक मारकवार यांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. याचवेळी औरंगाबादमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्यामुळे पालक हवालदिल झाले होते. याबाबत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना माहिती मिळताच त्यांनी व सिल्लोडचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी तत्काळ जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याशी संपर्क साधून इंजेक्शन उपलब्ध करून दिले. यामुळे हळूहळू नक्षने उपचारास प्रतिसाद देऊन कोरोनावर आपल्या प्रचंड इच्छाशक्तीने मात केली आहे.

नक्ष कोरोनातून पूर्णपणे बरा झाल्यानंतर शुक्रवारी दि.30 एप्रिल रोजी नक्षला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. नक्षला सुटी दिल्यानंतर नक्षचे वडील डॉ. शेखर दौड व त्यांच्या पत्नी डॉ. वैशाली दौड यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, डॉ. दीपक मारकवार, डॉ. संतोष मुद्रेवार, डॉ. तुकाराम औटे, डॉ. सुहास पाचलेगावकर, डॉ संतोष शिंदे व डॉ. नीलेश मिरकर यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले व कोरोनाचे लक्षणे असलेल्या बाळांच्या सर्व लक्षणांकडे कटाक्षाने लक्ष देण्याचे आवाहन केले.

हेही वाचा - राज्यात सप्टेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता - आरोग्यमंत्री राजेश टोपे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.