औरंगाबाद- मी आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, अशा आशयाची सुसाईड नोट लिहून सातारा परिसरातील ३३ वर्षीय महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बेबी गंगाधर जोगदंडे (वय ३३रा. तक्षशिला नगर सातारा परिसर) आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा पती खासगी कंपनीत नोकरी करतो. गुरुवारी बेबी यांनी मुलांना घरात वरच्या मजल्यावर जात आहे, असे सांगितले. यावेळी मुले घरातच खेळत होती. मात्र त्यानंतर बेबी यांनी घराच्या तिसऱ्या मजल्यावर साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.
डॉक्टरांनी केले मृत घोषित-
बराच वेळ झाल्यानंतरही बेबी खाली आल्याचं नाहीत, म्हणून मुलांनी तिसऱ्या मजल्यावर आवाज दिला. मात्र प्रतिसाद आला नाही. यावेळी शेजारच्यांच्या मदतीने बघितले असता, बेबी यांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्यानंतर तत्काळ बेबी यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून बेबी यांना मृत घोषित केले.
बेबी यांना 13 वर्षाचा मुलगा आणि 8 वर्षाची मुलगी आहे. मात्र बेबी यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास शेषराव चव्हाण करत आहेत.