ETV Bharat / city

20 Crore Cheating Case: कर्जाचे आमिष दाखवत २० लाख उकळणाऱ्याला अहमदाबादेतून अटक; औरंगाबादमधील आर्थिक गुन्हे शाखेची कामगिरी - Metal Industries owener Bacchubhai Patel

औरंगबादेतील महाराष्ट्र मेटल इंडस्ट्रीज मालक बच्चुभाई पटेल (रा. बन्सीलालनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना व्यवसायासाठी कर्जाची ( Metal Industries owener Bacchubhai Patel ) आवश्यकता आहे. ते 2018 साली मुंबईतील एका फायनान्स कंपनीत गेले होते. कर्ज न मिळाल्याने तिथून बाहेर पडताच त्यांना समीर शहा (रा. नालासोपारा, जि. पालघर) भेटला. कर्ज मिळवून देण्याचे आमिष ( Aurangabad crime news ) दाखवले.

औरंगाबाद पोलीस
औरंगाबाद पोलीस
author img

By

Published : Feb 8, 2022, 10:24 PM IST

औरंगाबाद - व्यवसायासाठी 20 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत प्रक्रिया शुल्क 20 लाख रुपये उकळणाऱ्या मुख्य आरोपीला औरंगाबाद आर्थिक गुन्हे शाखेने अहमदाबादेतून बेड्या ठोकल्या आहेत. धर्मेश घनशामभाई पटेल ( 48, रा. नवा वाडज, अहमदाबाद, गुजरात ) असे त्या आरोपीचे नाव आहे.

औरंगबादेतील महाराष्ट्र मेटल इंडस्ट्रीज मालक बच्चुभाई पटेल (रा. बन्सीलालनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना व्यवसायासाठी कर्जाची ( Metal Industries owener Bacchubhai Patel ) आवश्यकता आहे. ते 2018 साली मुंबईतील एका फायनान्स कंपनीत गेले होते. कर्ज न मिळाल्याने तिथून बाहेर पडताच त्यांना समीर शहा (रा. नालासोपारा, जि. पालघर) भेटला. कर्ज मिळवून देण्याचे आमिष ( Aurangabad crime news ) दाखवले. विश्वास संपादन करून त्याने बच्चूभाई यांना धर्मेश पटेलबाबत माहिती देत अहमदाबादेत त्यांची भेट करून दिली.

हेही वाचा-Somaiya Meets Governor: त्या 64 हल्लेखोरांना अटक न झाल्यास पुण्यात आंदोलन - सोमय्या

समीर शहाला 3 फेब्रुवारीला अटक

तक्रारदाराचा विश्वास बसल्यानंतर धर्मेश याने 20 कोटींचे कर्ज घेण्यासाठी आपल्या खात्यावर प्रक्रिया शुल्क म्हणून 20 लाख रुपये टाकण्याचे सांगितले. दरम्यान तक्रारदाराने धर्मेशच्या खात्यावर 2018 मध्ये 20 लाख रुपये टाकले. मात्र, फसवणूक झाल्याचे कळताच गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून दोघेही आरोपी पत्ते बदलत राहत होते. या गुन्ह्यातील आरोपी समीर राजेंद्र शहा ( 36, रा. नालासोपारा, जि. पालघर) याला पोलिसांनी 3 फेब्रुवारी रोजी अटक केली.

हेही वाचा-Malik Criticism of PM Modi : देशात कोरोना पसरण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार -नवाब मलिक

आरोपींना १० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
पोलिसांना मुख्य आरोपीविषयी माहिती दिल्यानंतर गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, कारभारी गाडेकर, गणेश शिंदे, संजय जारवाल, अनिल थोरे यांच्या पथकाने धर्मेश याला 7 फेब्रुवारी रोजी बेड्या ठोकल्या आहेत. दोन्ही आरोपींना न्यायालयाने 10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास निरीक्षक डी. एस. शिनगारे करत ( PI D S Shingare ) आहेत.
हेही वाचा- BJPs Manifesto For Goa : गोमंतकीय अर्थव्यवस्था करणार ५० अब्ज डॉलरची.. गोवेकरांसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.