ETV Bharat / city

आईने लक्ष ठेवायला सांगितले अन त्यानेच केला 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार - 5 year old girl abused aurangabad

एका 17 वर्षीय तरुणाने पाच वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना औरंगाबाद शहरात घडली आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी विधीसंघर्ष तरुणाला ताब्यात घेतले असून पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Sep 7, 2021, 10:27 PM IST

औरंगाबाद - एका 17 वर्षीय तरुणाने पाच वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना औरंगाबाद शहरात घडली आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी विधीसंघर्ष तरुणाला ताब्यात घेतले असून पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - औरंगाबाद : गौताळा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक खोळंबली

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित मुलीच्या आईला इतर तीन महिलांसोबत शनिवारी सायंकाळी मुकुंदवाडी परिसरात भाजीपाला आणायला जायचे होते. पीडितेसोबत तिच्याच वयाचा शेजाऱ्याचा एक मुलगा खेळत होता. दोघेही लहान असल्यामुळे पीडितेच्या आईने बाहेर मोबाईल बघत बसलेल्या तरुणास आपल्या लहान मुलीकडे लक्ष देण्यास सांगितले. आम्ही तासाभरात परत येत असल्याचेही पीडितेच्या आईने कळविले.

घराशेजारील चारही महिला बाजारात गेल्यामुळे आजूबाजूला कोणीही नव्हते. गोड बोलून त्या तरुणाने लहान मुलीला तिच्याच घरात नेले, तिच्यावर अत्याचार केला व नंतर तो निघून गेला. भाजीपाला घेऊन पीडितेची आई घरी आली तेव्हा मुलगी रडत होती. तिला सांगताही येत नव्हते. शेवटी आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारल्यानंतर घटना समजली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले असून पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - भांडण सोडवणाऱ्या सुरक्षा रक्षकावरच जमावाचा हल्ला, कंपनीचीही तोडफोड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.