ETV Bharat / city

Amarvati Accident ऑटोचालने मानवतेचे दर्शन दाखवलं पण त्या शिक्षकाचे अपघाती निधन - अमरावती मुख्याध्यापक रवींद्र दादाराव गावंडे यांचे अपघाती निधन

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परसोडा येथील प्रभारी मुख्याध्यापक असलेले रवींद्र दादाराव गावंडे यांच्या दुचाकीचा अपघात झाला होता. त्यांना अपघातानंतर रुग्णालयात भरती करण्यात आलं होते. मात्र, रात्री 8 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली zp school teacher ravindra gawande death in bike accident आहे.

ravindra gawande
ravindra gawande
author img

By

Published : Aug 12, 2022, 10:47 PM IST

अमरावती - वेळ सकाळी दहाची. प्रत्येक कर्मचारी आपल्या कार्यालयात, शाळेत जाण्याच्या तयारीत असताना अचानक महापौर बंगल्यासमोर शे दीडशे लोकांची गर्दी जमते. अपघाताचे दृश्य पाहून साहजिकच प्रत्येकाच्या मनात धडकी भरलेली. दूचाकीधारक निपचिड पडला असल्याने उपस्थितांनी बघ्याची भूमिका निभावली. काहींनी ट्रक चालकाला प्रसाद देण्यात धन्यता मानली. मात्र, विद्यापीठात मूल्यमापन कार्यास जाणाऱ्या एका प्राध्यापकाने दुचाकीधारकाची नाडी बघितली व तात्काळ मुज्जफर खान नावाच्या ऑटो चालकाच्या सहकार्याने तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. जखमी दुचाकीस्वार शिक्षक असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न दिवसभर सुरु होते. दुर्दैवाने मात्र रात्री 8 वाजता त्यांची प्राणज्योत zp school teacher ravindra gawande death in bike accident मालवली.

काय आहे संपूर्ण प्रकरण? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परसोडा येथील प्रभारी मुख्याध्यापक असलेले रवींद्र दादाराव गावंडे नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास आपल्या दुचाकीने शाळेला जातांना महापौर बंगल्या समोर मिक्सर ट्रकसोबत अपघात झाला. अपघाताने पोटाला भीषण मार बसल्याने रवींद्र गावंडे बेशुद्ध झाले. चिलम छावणी परिसरात बघ्यांची गर्दी वाढली पण कोणी गावंडे यांना उचलण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचवेळी अशोक महाविद्यालय चांदुर रेल्वे येथील मेजर प्रा. प्रशांत ठाकरे हे विद्यापीठात मूल्यमापन कार्यास जात होते. त्यांनी मानवतेच्या दृष्टीने सर्वप्रथम दुचाकीधारक गावंडे यांची नाडी तपासली व उपस्थितांना सहकार्य मागितले. ट्रक चालकाला प्रसाद देण्यात धन्यता मानणारे पुढे येईना. पण, अचानक मुज्जफर खान नावाच्या युवकाने माणुसकीचा परिचय देत प्रशांत ठाकरे यांच्या सहकार्याने इर्विनला हलविले. इर्विनमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक औषधोपचार करून रुग्णाला खाजगी दवाखान्यात हलविण्याचा सल्ला दिला. मेजर ठाकरे यांनी राजेश वानखडे व मुज्जफर खान च्या सहकार्याने तात्काळ खाजगी हॉस्पिटलला हलविले.

अखेर दुख:द निधन सकाळी खाजगी हॉस्पिटलला हलविल्यानंतर ही बातमी शैक्षणिक वर्तुळात वाऱ्यासारखी पसरली. रवींद्र गावंडे यांचे मित्र तथा शेजारी प्रशांत उंडे यांनी मोठे परिश्रम घेऊन शिक्षक मित्रांच्या सहकार्यातून आठ बॉटल रक्त व दोन युनिट प्लास्मा देण्यात आले. अखेर रात्री 8 च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे घोषित केले.

हेही वाचा - Navneet Rana अमरावतीत गोळीबारानंतर नवनीत राणांचे पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.