ETV Bharat / city

युवास्वाभिमान महिला आघाडीकडून खासदार अरविंद सावंत अन् शिवसेनेचा निषेध

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, त्यांना कारागृहात टाकू अशी धमकी देणारे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि शिवसेनेच्या विरोधात रोष व्यक्त करीत युवस्वाभिमान पार्टीच्या महिला आघाडीच्यावतीने बुधवारी निषेध नोंदवला.

Yuvaswabhiman Mahila Aghadi Protest  against MP Arvind Sawant

author img

By

Published : Mar 24, 2021, 3:38 PM IST

Updated : Mar 24, 2021, 3:48 PM IST

अमरावती - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, त्यांना कारागृहात टाकू अशी धमकी देणारे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आणि शिवसेनेच्या विरोधात रोष व्यक्त करीत युवस्वाभिमान पार्टीच्या महिला आघाडीच्यावतीने बुधवारी निषेध नोंदवला. या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदनही सादर करण्यात आले.

खासदार राणांच्या भाषणाने झोंबल्या मिरच्या -

पोलीस खात्यातून निलंबित असणाऱ्या सचिन वाझे या व्यक्तीला मुख्यमंत्री पुन्हा पोलीस सेवेत घेतात. याबाबत खासदर नवनीत राणा यांनी मोस्ट करपटेड, खंडणीबाज अधिकाऱ्याची नियुक्ती करून मुख्यमंत्री त्याच्या माध्यमातून खंडणी वसुली करत असल्याबाबत लोकसभेत भाषण दिले. खासदार नवनीत राणा यांच्या भाषणामुळे शिवसेनेला मिरच्या झोंबल्या असा आरोप युवस्वाभिमान पार्टीच्या महिलांनी केला.

युवास्वाभिमान महिला आघाडीकडून खासदार अरविंद सावंत यांचा निषेध
खासदार अरविंद सवंत विरुद्ध घोषणाबाजी -
संसदेच्या लॉबीमध्ये खासदार अरविंद सावंत यांनी खासदार नवनीत राणा यांना धमकी दिल्याचा प्रताप महाराष्ट्रातील सर्व महिलांचा अवमान करणारा आहे, असा आरोप करीत युवस्वाभिमान महिला आघाडीच्यावतीने खासदार सावंत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
आशा आहेत मागण्या -

जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात युवास्वाभिमान महिला आघाडीच्यावतीने मनसुख हिरेन हत्याकांड आणि सचिन वाझे प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत करावी. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीची ईडी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली.

Last Updated : Mar 24, 2021, 3:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.