ETV Bharat / city

Wadali Lake Renewal : वडाळी तलाव परिसर बदलणार कुस; पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा - वडाळी तलाव नुतनीकरण यशोमती ठाकूर प्रतिक्रिया

अमरावती शहरातील सर्वात जुने आणि महत्वाचे पर्यटन स्थळ असणाऱ्या वडाळी तलावाचा परिसर आता लवकरच कूस बदलणार आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या पुढाकारामुळे या संपूर्ण तलाव परिसराचा कायापालट होणार असून येणाऱ्या काळात या तलाव परिसराचा लूक पर्यटकांना खास आकर्षित करणार आहे.

Wadali Lake Renewal
Wadali Lake Renewal
author img

By

Published : May 18, 2022, 9:02 PM IST

Updated : May 18, 2022, 9:08 PM IST

अमरावती - अमरावती शहरातील सर्वात जुने आणि महत्वाचे पर्यटन स्थळ असणाऱ्या वडाळी तलावाचा परिसर आता लवकरच कूस बदलणार आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या पुढाकारामुळे या संपूर्ण तलाव परिसराचा कायापालट होणार असून येणाऱ्या काळात या तलाव परिसराचा लूक पर्यटकांना खास आकर्षित करणार आहे.

प्रतिक्रिया

तीन पुतळे ठरणार आकर्षण - अमरावती महापालिकेच्या क्षेत्रात असणाऱ्या वडाळी तलावाचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वीच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असणाऱ्या वडाळी तलाव आणि वनविभागाच्या क्षेत्रात असणाऱ्या तुटक्या तलावाचा कायापालट व्हावा, या उद्देशाने या बैठकी दरम्यान आदित्य ठाकरे यांनी वडाळी तलावाच्या सौंदरी करण्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना पूर्ण सहकार्य राहील, असा शब्द दिला. वडाळी तलावावर 1932 आली वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामला जात असताना राष्ट्रपिता महात्मा गांधी येऊन गेले होते. महात्मा गांधींच्या स्मृतीत वडाळी तलावावर महात्मा गांधींचा पुतळा उभारण्यात येणार आहे. यासह छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळादेखील वडाळी तलावावर उभारला जाणार असून या तिन्ही महापुरुषांचे पुतळे अमरावतीकरांसाठी खास आकर्षण ठरणार आहेत. वडाळी तलावाच्या विकासामुळे जिल्ह्यात एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र अमरावतीकरांना उपलब्ध होईल, असा विश्वास पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.

असा आहे वडाळी तलावाचा इतिहास - अमरावती शहराच्या पूर्व आणि दक्षिण भागातील टेकड्यांवरून खाली वेगात येणाऱ्या पावसाच्या पाण्याला अडविण्यासाठी सन 1889मध्ये इंग्रज शासकांनी वडाळी तलाव बांधला. या तलावाला सहाय्यभूत म्हणून फुटका तलाव आणि भवानी तलावाची निर्मिती 1899 मध्ये करण्यात आली. इंग्रज काळात शहरातील कॅम्प परिसरात वडाळी तलावातून पाणीपुरवठा केला जात होता. त्यासाठी तलावाच्या पायथ्याशी जलशुद्धीकरण यंत्रणा उभारण्यात आली होती. टेकड्यांवरून वाहत येणारे पाणी आधी भवानी तलावात, तर भवानी तलावांची पातळी ओलांडल्यावर पाच किलोमीटर अंतरावरील पुढच्या तलावात यायचे. फुटका तलाव तुडुंब भरल्यावर त्यातील पाणी वडाळी तलावात पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

वडाळी तलावाची पाणी क्षमता आहे 5 दशलक्ष घनमीटर - वडाळी तलावाचे पाणलोटक्षेत्र दोन चौरस मैल असून तलावाची पाणी क्षमता 5 दशलक्ष घनमीटर एवढी आहे. या तलावाने 21 हेक्टर जागा व्यापली आहे. त्यापैकी तलावाखालील जमीन 20.99 हेक्टर इतकी आहे. तलावा लगत असणाऱ्या उद्यानाच्या वापरातील जागा 2.81 हेक्टर आहे. तलावाची मध्य भागाची खोली 18 मिटर असून उन्हाळ्यात ती 12 ते 10 मीटर खाली येते.

सध्या तलावाची अवस्था अत्यंत खराब - अमरावती महापालिकेच्या क्षेत्रात असणाऱ्या वडाळी तलावातील पाणी गत 20 वर्षांपासून खराब झाले असून या तलावाला विविध प्रकारच्या वनस्पतींनी व्यापलेला आहे. 2019 मध्ये हा तलाव पूर्णतः आटला होता. त्यावेळेस या दलातील घाण बाहेर काढण्यात आली नाही. यामुळे तलाव भरल्यावर पुन्हा या या तलावाच्या पाण्यावर विविध वनस्पती व्यापल्या गेल्या असून कमळाच्या झाडांनी संपूर्ण तलाव व्यापून टाकला आहे. या तलावाच्या पाण्याचा दुर्गंध येतो आहे.

हेही वाचा - Melghat Water Crisis : मेळघाटातील नागरीक गढूळ पाण्याने त्रस्त; खासदार मात्र हनुमान चालिसा म्हणण्यात व्यस्त

Last Updated : May 18, 2022, 9:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.