अमरावती - राज्यात येत्या २१ डिसेंबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होऊ घातल्या आहे. अमरावती जिल्ह्यातही २१ तारखेला तिवसा व भातकुली नगरपंचायतची निवडणूक (Tiwsa Panchayat election) होऊ घातली आहे.या निवडणुकीत सर्वच पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. रविवारी या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहे. एकीकडे कडाक्याची थंडी असली तरी तिवसा शहरात मात्र निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. काल तिवसा शहरात विविध पक्षाच्या सभा पार पडल्या. यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले.
कुणासोबत युती अन् आघाडी
तिवसा नगर पंचायत निवडणूकीत शिवसेना-राष्ट्रवादी आणि लढा संघटना ही एकत्र निवडणूक लढत आहे. तर भाजप, काँग्रेस, वंचित आणि युवा स्वाभिमान पक्ष हे स्वतंत्र निवडणूक लढत आहे. तिवसा शहर हे शिवसेनाचा बालेकिल्ला समजला जात होता. शिवसेनेचे दिवंगत नेते नाना वानखडे यांचं इथं वर्चस्व होत. पण मागील नगरपंचायत निवडणूकीत येथे काँग्रेसने आपलं वर्चस्व सिद्ध करत सत्ता स्थापन केली होती. तेव्हा काँग्रेसचे १०,एक अपक्ष काँग्रेसप्रणित, शिवसेना ४ राष्ट्रवादी १, कम्युनिस्ट पक्षाच्या १ नगरसेवक निवडणूक आले.
भातकुली नगरपंचायतचे बलाबल
अमरावती जिल्ह्यातील भातकुली नगर पंचायतमध्ये मध्ये आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षची सत्ता होती. या निवडणुकीत 17 पैकी सर्वाधिक 8 नगरसेवक या युवा स्वाभिमान पक्षाचे होते. काँग्रेसचे 5, शिवसेना 2 अपक्ष 2 नगरसेवक निवडणूक आले होते.यंदाही या निवडणुकीत रवी राणा, मंत्री यशोमती ठाकूरसह सर्वच पक्षांची आपली ताकद पणाला लावली आहे.
हेही वाचा - Amravati Violence : अमरावती शांतच राहू दे.. दोन्ही बाजूंच्या दोषींवर कारवाई करणार, यशोमती ठाकूर यांनी फडणवीसांना खडसावले