ETV Bharat / city

मुसळधार पावसामुळे अमरावतीकरांची तारांबळ; राजापेठ भुयारी मार्ग पाण्याखाली

पावसामुळे अमरावतीकरांची तारांबळ उडाली आहे. शहरातील राजापेठ राजकमल, दस्तूर नगर, यशोदा नगर, रुक्मिणी नगर, गाडगे नगर, शेगावनाका आदी परिसरात पाणी तुंबले आहे.

heavy rain in amravati
heavy rain in amravati
author img

By

Published : Sep 7, 2021, 4:55 PM IST

Updated : Sep 7, 2021, 5:46 PM IST

अमरावती - मंगळवारी पहाटे अमरावती शहर आणि लगतच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे अमरावतीकरांची तारांबळ उडाली आहे. शहरातील राजापेठ राजकमल, दस्तूर नगर, यशोदा नगर, रुक्मिणी नगर, गाडगे नगर, शेगावनाका आदी परिसरात पाणी तुंबले आहे. बडनेरा येथील नवी वस्ती परिसरात येणाऱ्या बालाजी नगर येथे अनेक घरे पाण्याखाली गेल्यामुळे या भागात हाहाकार उडाला आहे.

प्रतिक्रिया

बडनेरा नवी बस्ती परिसरात अनेक घर पाण्यात -

ढगांच्या कडकडाटासह पहाटे तीन वाजतापासून सकाळी 6 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस कोसळला. पावसाला सुरुवात होताच काही वेळातच बडनेरा नवी वस्ती परिसरात येणाऱ्या बालाजी नगर या परिसरातील अनेक घर अर्ध्यापर्यंत पाण्याखाली बुडाली. या परिसरालगत असणाऱ्या नाल्यातील पाणी थेट नागरी वसाहतीत शिरल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी गेले. या परिसरात कंबरभर पाणी साचल्यामुळे नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. या भागातील अनेकांची वाहने पाण्यात बुडाली अनेकांच्या घरात विंचू, साप शिरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

बचाव पथकासह महापौरांनी घेतली परिसरात धाव -

बडनेरा जुनी वस्ती परिसरात येणाऱ्या बालाजी नगर येथील गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच महापौर चेतन गावंडे भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांच्यासह महापालिकेचे बचाव पथक बालाजी नगर परिसरात धडकले. पहाटे साडेतीन वाजल्यापासून या परिसरातील पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. या परिसरातून वाहणाऱ्या नाल्याची सफाई केली नसल्यामुळे या नाल्याचे पाणी परिसरात शिरले. तसेच या भागात रस्त्यांचे बांधकाम झाले नाहीत आणि हव्या त्या सुविधा या भागात उपलब्ध नसल्यामुळे हा संपूर्ण परिसर पाण्याखाली तुंबून गेला असल्याचा आरोप परिसरातील रहिवाशांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला.

राजापेठ अंडरपासमध्ये साचले पाणी -

अवघ्या दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या राजापेठ अंडरपासमध्ये पाणी साचले आहे. यामुळे राजापेठ ते दस्तूर नगर हा मार्ग बंद झाला आहे. अंडरपासमध्ये साचणारे पाणी बाहेर काढण्यासाठी कुठलीही व्यवस्था केली नसल्यामुळे अतिशय गर्दीचा आणि महत्त्वाचा हा मार्ग पावसामुळे बंद झाला आहे.

व्यापारी संकुलांमध्ये साचले पाणी -

शहरातील शेगाव नाका, गाडगेनगर, राजकमल चौक, रुक्मिणी नगर, फरशी स्टॉप, दस्तूर नगर या भागातील अनेक व्यापारी संकुलांमध्ये पाणी शिरले आहे. तळमजल्यावर असणारे दुकान, हॉटेल यामध्ये पाणी शिरले आहे. महापालिकेच्यावतीने व्यापारी संकुलांमध्ये साचलेले पाणी बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले, तरी या पावसामुळे अनेक व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे.

तलावांची पातळी वाढली -

मंगळवारी पहाटेपासून अमरावती शहर आणि लगतच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे शहरातील वडाळी आणि छत्री या दोन तलावांची पाण्याची पातळी वाढली आहे. यावर्षी अमरावती शहरात हवा तसा पाऊस झाला नसल्यामुळे हे दोन्ही तलाव अद्याप पूर्णतः भरले नाहीत. आजच्या पावसामुळे मात्र दोन्ही तलावांनी पातळी गाठली असून आणखी काही वेळ मुसळधार पाऊस कोसळला तर हे दोन्ही तलाव ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे.

बगाजी सागर धरणाचे ३१ दरवाजे उघडले -

दरम्यान, गेल्या ३ दिवसांपासून विदर्भात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढत आहे. अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेले बगाजी सागर धरण सद्या ९४.४३% भरलेले आहे. त्यामुळे या धरणाचे आज सकाळी १० वाजता ३१ दरवाजे ४५ सेमीने उघडण्यात आलेत. सद्या बगाजी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग होतो आहे. १३०७ क्युमेंकने पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. या धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

व्हिडीओ

हेही वाचा - बोरी नदीला पूर आल्याने सात्री गावाचा संपर्क तुटला, उपचाराअभावी चिमुकल्या आरुषीचा जीव गेला

Last Updated : Sep 7, 2021, 5:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.