अमरावती - अमरावती मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत अंदाजे ३५ टक्के मतदान झाले . दुपारी उन्हामुळे अनेक मतदान केंद्र ओस पडले आहेत. उन्हामुळे नागरिकांनी बाहेर पडणे टाळल्याने मतदान केंद्रांवर मतदारांची प्रतीक्षा करण्यात येत आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघात अमरावती, बडनेरा, अचलपूर, तिवसा, दर्यापूर आणि मेळघाट विधानसभा मतदारसंघात २ हजार मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत मतदार मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर आले. ११ वाजेपर्यंत अमरावती मतदार संघात १७.७२ टक्के मतदान झाले होते. दुपारी १ पर्यंत अंदाजे ३५ टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दुपारी १२ नंतर उन्हाचा पारा वाढताच अनेक मतदान केंद्रांवरील गर्दी ओसरली आहे. ५ वाजता मतदान केंद्रावर पुन्हा गर्दी होण्याची शक्यता आहे.