ETV Bharat / city

अमरावतीत निघाली विदर्भाच्या राजाची भव्य मिरवणूक - Amravati news

अमरावतीतील विदर्भाच्या राजा गणेशाची परंपरे प्रमाणे भव्य विसर्जण मिरवणूक अमरावती शहरातून निघाली. याचा मूर्तीची पुढच्या गणेशोत्सवात पुन्हा स्थापना केली जाणार आहे.

विदर्भाचा राजा गणेशाची विसर्जण मिरवणूक
author img

By

Published : Sep 17, 2019, 9:21 AM IST

अमरावती - विदर्भाचा राजा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अमरावतीच्या न्यू आझाद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या भव्य गणरायाच्या मूर्तीची आज अमरावती शहरात भव्य मिरवणूक निघाली. या मिरवणुकीमुळे अमरावती शहर दुमदुमून गेले. विशेष म्हणजे पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्याच्या उद्देशाने विदर्भाच्या राजाचे विसर्जन न करता गणरायाची ही भव्य मूर्ती पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवात पुन्हा एकदा स्थापन केली जाणार आहे.

विदर्भाचा राजा गणेशाची विसर्जण मिरवणूक

जिल्हा सामान्य रुग्णालयालगत खापर्डे बगीचा परिसरात न्यू आझाद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणेशोत्सवादरम्यान अमरावती शहरातील सर्वात भव्य अशी गणरायाची मूर्ती स्थापन केली जाते. गणेशोत्सवादरम्यान अमरावती शहरासह जिल्हाभरातील भाविकांची गर्दी विदर्भाच्या राजाच्या दर्शनासाठी उसळते. अनंत चतुर्दशीला शहरातील सर्व घरगुती आणि लहान मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपतीचे विसर्जन झाले असताना दरवर्षीप्रमाणे अनंत चतुर्दशीच्या चार दिवसानंतर विसर्जनासाठी विदर्भाच्या राजाची भव्य मिरवणूक खापर्डे बगीचा येथून निघाली. या मिरवणुकीत अमरावती शहरातील सर्व ढोल-ताशा मंडळ सहभागी झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती यासोबतच टाळ मृदुंगाच्या नादात रंगलेले वारकरी या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले. इर्विन चौक, रेल्वेस्थानक चौक, राजकमल, जयस्तंभ, मालवीय चौक मार्गे विदर्भाच्या राजाची मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत तीस ते पस्तीस हजार अमरावतीकर सहभागी झाले होते.

Intro:' विदर्भाचा राजा' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अमरावतीच्या न्यू आझाद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या भव्य गणरायाच्या मूर्तीची आज अमरावती शहरात भव्य मिरवणूक निघाली. या मिरवणुकीमुळे अमरावती शहर दुमदुमून गेले. विशेष म्हणजे पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्याच्या उद्देशाने विदर्भाच्या राजाचे विसर्जन न करता गणरायाची ही भव्य मूर्ती पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवात पुन्हा एकदा स्थापन केली जाणार आहे.

Body:जिल्हा सामान्य रुग्णालया लगत खापर्डे बगीचा परिसरात न्यू आझाद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणेशोत्सवादरम्यान अमरावती शहरातील सर्वात भव्य अशी गणरायाची मूर्ती स्थापन केली जाते. गणेशोत्सवादरम्यान अमरावती शहरासह जिल्हाभरातील भाविकांची गर्दी विदर्भाच्या राजाच्या दर्शनासाठी उसळते. अनंत चतुर्दशीला शहरातील सर्व घरगुती आणि लहान मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपतीचे विसर्जन झाले असताना दरवर्षीप्रमाणे अनंत चतुर्दशीच्या चार दिवसानंतर आज विसर्जनासाठी विदर्भाच्या राजाची भव्य मिरवणूक खापर्डे बगीचा येथून निघाली. या मिरवणुकीत अमरावती शहरातील सर्व ढोल-ताशा मंडळ सहभागी झालेत. छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती यासोबतच टाळ मृदुंगाच्या नादात रंगलेले वारकरी या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले. इर्विन चौक, रेल्वेस्थानक चौक, राजकमल,जयस्तंभ,मालवीय चौक मार्गे विदर्भाच्या राजाची मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत तीस ते पस्तीस हजार अमरावतीकर सहभागी झालेत.
मिरवणुकीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता या मिरवणुकी दरम्यान शहरातील गर्ल्स हायस्कूल ते इरविन चौक बस स्थानक ते रेल्वे स्टेशन राजापेठ ते राजकमल या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक दिनेश बूब यांनी यावर्षी गणरायाची ही भव्य मिरवणूक नशिर होण्याचा निर्णय घेतला असून शहरात निघालेल्या भव्य मिरवणुकीनंतर विदर्भाचा राजा ची मूर्ती पुन्हा एकदा न्यू आझाद गणेश मंडळात आणण्यात आली असून तिला सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.