अमरावती - अमरावतीतील 55 वर्षीय औषध विक्रेते उमेश कोल्हे यांची 21 जून रोजी हत्या करण्यात आली होती. उमेश कोल्हे यांची हत्या ( Umesh Kolhe Murder Case ) नुपूर शर्मांबाबात समाज माध्ममावर केलेल्या पोस्टमुळेच करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी स्पष्ट केलं आहे. त्याप्रकरणी सातव्या मुख्य आरोपीला काल ( 2 जुलै ) नागपुरमधून अटक करण्यात आली होती. शेख इरफान शेख रहीम असे या आरोपीचे नाव आहे. आज ( 3 जुलै ) त्याला अतिशय कडेकोट बंदोबस्तात जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायालयाने शेख इरफान शेख रहीमला ७ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्याचे आदेश दिले ( Shaikh Irfan Shaikh Rahim To Police Custody ) आहे.
-
#Update | Umesh Kolhe murder case: Amravati court sends mastermind Shaikh Irfan Shaikh Rahim to police custody till July 7
— ANI (@ANI) July 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#Update | Umesh Kolhe murder case: Amravati court sends mastermind Shaikh Irfan Shaikh Rahim to police custody till July 7
— ANI (@ANI) July 3, 2022#Update | Umesh Kolhe murder case: Amravati court sends mastermind Shaikh Irfan Shaikh Rahim to police custody till July 7
— ANI (@ANI) July 3, 2022
शेख इरफान शेख रहीम हाच मुख्य सूत्रधार - उमेश कोल्हे हत्या प्रकरणात शेख इरफान शेख रहीम हाच मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आज पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा या दृष्टीने न्यायालयाने शेख इरफान शेख रहीम याला सात जुलै पर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहे.
शेख इरफान शेख रहीम याच्या संस्थेची होणार चौकशी - शेख इरफान शेख रहीम हा एका स्वयंसेवी संस्थेचा पदाधिकारी असल्याचे समोर आले. या संस्थेची देखील चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणासाठी या संस्थेच्या वतीने किंवा इतर कुठून शेख इरफान शेख रहीम याला आर्थिक पुरवठा झाला का? याचा तपास देखील केला जाणार आहे. या हत्या प्रकरणात वापरण्यात आलेल्या दुचाकी, एक कार देखील जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती कोल्हे कुटुंबीयांचे वकील पंकज तामने यांनी दिली आहे. या प्रकरणात कोल्हे कुटुंबीयांच्या वतीने वकील पंकज तामने यांच्यासह गायत्री दाणी आणि महेश देशमुख काम पाहत आहेत.
काय आहे प्रकरण? - शहरातील उमेश कोल्हे ( रा. घनश्यामनगर ) या मेडिकल व्यावसायिकाची चाकून गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. 21 जून रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. कोल्हे यांचे तहसील कार्यालय परिसरात मेडिकल स्टोअर्स आहे. मंगळवारी रात्री त्यांनी मेडिकल स्टोअर्स बंद केले. त्यानंतर ते मुलगा संकेत (२७) व सून वैष्णवी यांच्यासोबत घरी जायला निघाले. समोर एका दुचाकीवर उमेश तर मागे दुसऱ्या दुचाकीवर मुलगा संकेत व त्यांची पत्नी वैष्णवी जात होते. न्यू हायस्कूल मेन समोरील गल्लीतून जात असताना एका दुचाकीजवळ तीन जण उभे होते. त्यातील एकाच्या हातात चाकू होता. ते तिघेही अचानक उमेश यांच्या दुचाकीच्या आडवे झाले.
तिघांपैकी एकाने केला गळ्यावर वार - त्यामुळे उमेश यांनी दुचाकी थांबविली. यावेळी काही कळण्याआधीच तिघांपैकी एकाने चाकूने उमेश यांच्या गळ्यावर वार केला तर ईतरांनीही मारहान करण्यास मदत केली. त्यामुळे उमेश हे दुचाकीसह खाली कोसळले. हा प्रकार त्यांच्या मागे येत असलेल्या मुलगा संकेत व सून वैष्णवी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी दुचाकी थांबवून आरडाओरड केली. त्यामुळे तिनही मारेकरी दुचाकीने तेथून पळून गेले. त्यानंतर संकेत व वैष्णवी यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने उमेश यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान काही वेळातच उमेश यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना देण्यात आली.
'या' आरोपींना अटक - या प्रकरणी पोलिसांनी अतिफ राशीद आदिल रशीद ( वय, २४ रा. मौलाना आझाद कॉलनी), मुदस्सीर अहेमद शेख इब्राहिम ( वय २२, रा. बिसमिल्लानगर ), शाहरूख पठाण हिदायत खान ( वय२४, रा. सुफियाननगर), अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तसलिम ( वय, २४ रा. बिसमिल्लानगर ) आणि शोएब खान उर्फ भुऱ्या वल्द साबीर खान (वय २२, रा. यास्मीननगर ), युसूफ खान बहादूर खान (44) आणि शेख इरफान शेख रहीन ( वय, 35 ) असं अटक केलेल्या सात व्यक्तींच नावं आहे.
हेही वाचा - Umesh Kolhe Murder Case : एनआयए पथकासह अमरावती पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी