ETV Bharat / city

पिसाळलेल्या माकडाने घेतला दोघांना चावा; परतवाडा परिसरात खळबळ

पिसाळलेले माकड मागील काही दिवसांपासून ब्राह्मण सभा कॉलनी परिसरात फिरत आहे. या माकडाला आवर घालण्यासाठी वन विभागाकडे तक्रार देण्यात आली आहे.

Two people seriously injured when monkey bit them
पिसाळलेले माकड चावल्याने दोन जण गंभीर जखमी
author img

By

Published : Jun 17, 2020, 6:58 PM IST

अमरावती - परतवाडा शहरात ब्राम्हण सभा काॅलनीतील परिसरात दोन व्यक्तींना पिसाळलेल्या माकडाने चावा घेतल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळी हा प्रकार घडला. या घटनेमुळे परतवाडा शहरात खळबळ उडाली आहे. हेमंत नारायण गुजर (44) आणि इरफान खान नशीर खान (30) असे माकडाच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नवे आहेत.

हेमंत गुजर यांच्या डाव्या पायाच्या पोटरीला आणि मांडीला माकडाने जबर चावा घेतला. तर इरफान खान नशीर खान याला 3 दिवसापुर्वी माकडाने चावा घेत जखमी केले. माकडाच्या हल्ल्यात हेमंत गुजर गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचाराकरीता अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा... 'भारत-चीन सीमावाद तातडीने सोडवा, नाहीतर...'

पिसाळलेले माकड मागील काही दिवसांपासून ब्राह्मण सभा कॉलनी परिसरात फिरत आहे. या माकडाला आवर घालण्यासाठी वन विभागाकडे तक्रार देण्यात आली आहे. वन विभागाने या तक्रारीची दखल घेऊन पिसाळलेल्या माकडाचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.