ETV Bharat / city

उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणात नव्याने अटक दोघांना अटक; 12 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी - उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरण

उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणात नव्याने अटक दोन आरोपींना 12 ऑगस्टपर्यंत एनआयएकडून कोठडी सुनावणीवण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयात दोन्ही आरोपींना विशेष एनआयए कोर्टात रिमांडसाठी हजर करण्यात आला होते. अमरावतीवरून बुधवारी अटक करण्यात आलेल्या अरबाज आणि मौलवी मुशफीक अहमद यांना एनआयए कोर्टात हजर करण्यात आले.

उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणात नव्याने अटक दोघांना अटक

author img

By

Published : Aug 5, 2022, 8:36 PM IST

अमरावती - उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणात नव्याने अटक दोन आरोपींना 12 ऑगस्टपर्यंत एनआयएकडून कोठडी सुनावणीवण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयात दोन्ही आरोपींना विशेष एनआयए कोर्टात रिमांडसाठी हजर करण्यात आला होते. ( Two arrested In Umesh Kolhe Murder Case ) अमरावतीवरून बुधवारी अटक करण्यात आलेल्या अरबाज आणि मौलवी मुशफीक अहमद यांना एनआयए कोर्टात हजर करण्यात आले.

एनआयएने मंगळवारी आवळल्या आरोपींच्या मुसक्या - एनआयएने मुशिद अहमद अब्दुल रशीद आणि अब्दुल अरबाज अब्दुल सलीम या दोघांना मंगळवारी अमरावतीतून ताब्यात घेतले आहे. या आरोपींना मुंबईतील सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात आणण्यात येणार आहे. यापूर्वी देखील अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना मुंबईतील न्यायालयात हजर करण्यात आले होते.

एका फरार आरोपीचाही समावेश - उमेश कोल्हे हत्याकांडाचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने एनआयएकडे दिल्यानंतर या प्रकरणातील सर्व आरोपींना मुंबई सत्र न्यायालयातील विषय एनआयए न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सातही आरोपींना दोन वेळा एनआयए कोठडी देण्यात आली होती. त्यापैकी एक आरोपी फरार असल्याचे देखील सांगण्यात आले होते. त्यापैकी मंगळवारी अटक करण्यात आलेल्या आरोपीत त्याचा सहभाग असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

एनआयएने मागितली आरोपींची कोठडी - एनआयएने न्यायालयामध्ये म्हटले होते, की या आरोपींच्या दहशतवादी संघटनेची संबंध असल्याचे अनेक पुरावे तपासा दरम्यान सापडले आहेत. सध्या आरोपींचा कोणत्या दहशतवादी संघटनेची संबंध आहे, यासंदर्भात खुलासा करता येणार नाही. मात्र या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असू शकतो. यासाठी या आरोपींना एनआयए कोठडी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. या सर्व आरोपींविरोधात दहशतवादी संघटनेच्या संबंधित युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

'या' आरोपींच्या आवळल्या होत्या मुसक्या - एनआयएकडून यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये इरफान खान, मुदस्सर अहमद उर्फ सोनू राजा शेख इब्राहिम, शाहरुख पठाण उर्फ बादशाह हिदायत खान, अब्दुल तौफिक उर्फ नाना शेख तस्लीम उर्फ भैय्या साबीर खान, अतीब रशीद आदिल रशीद, युसूफ खान बहादुर खान या आरोपींचा समावेश होता.

काय आहे उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरण - उमेश कोल्हे हे अमरावती तहसील परिसरात पशूंच्या औषध विक्रीचे दुकान चालवत होते. डॉक्टर युसुफ खान हा त्यांच्याकडून नियमित औषधे खरेदी करायचा. उमेश कोल्हे यांच्यासोबत त्याची बऱ्यापैकी ओळख झाल्यामुळे कोल्हे यांनी त्याला अनेकदा आर्थिक मदत केल्याचीही माहिती समोर आली असून, त्याच्याकडे उधारीची बरीच मोठी रक्कम थकीत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. असे असताना आपल्या व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ दोन पोस्ट शेअर केल्या होत्या. डॉक्टर युसूफ खानने उमेश कोल्हे यांनी शेअर केलेल्या पोस्टचे स्क्रीनशॉट काढून इतर ठिकाणी त्या शेअर केल्या होत्या.

हेही वाचा - डीसले गुरुजी पुन्हा अडचणीत! चौकशी सुरू असताना राजीनामा देता येत नसल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.