अमरावती - शहरातील औषधी विक्रेते उमेश कोल्हे यांची 21 जुलै रोजी रात्री साडेदहा वाजता श्याम चौक लगत घंटी घड्याळ परिसरात निर्घृण हत्या ( Umesh Kolhe Murder Case ) करण्यात आली होती. त्यांनी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा ( Former BJP Spokesperson Nupur Sharma ) यांच्या समर्थनार्थ पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे त्यांची हत्या झाल्याचे उघड आहे. अमरावती पोलिसांनी ही माहिती दिली आहे. कोल्हे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजकमल चौकात सोमवारी अकरा वाजता अमरावतीकर उपस्थित राहणार आहेत.
खासदार अनिल बोंडेंनी केले श्रद्धांजली सभेचे आयोजन - अमरावती शहरात शांतता नांदावी, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाने राजकमल चौक येथे उमेश कोल्हे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी सकाळी 11 वाजता अमरावतीकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार अनिल बोंडे ( MP Anil Munde ) यांनी केले आहे. ऊन असो, वारा असो किंवा पाऊस असो या श्रद्धांजली सभेला मी उपस्थित राहणार आहे. अमरावतीकरांनी देखील राजकमल चौकात उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार अनिल बोंडे यांनी केले आहे.
अमरावती भयमुक्त करण्याचा उद्देश - अमरावती शहर भयमुक्त व्हावे या उद्देशाने सोमवारी अकरा वाजता उमेश कोल्हे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे खासदार अनिल बोंडे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील संवेदनशील शहर म्हणून ओळख असणाऱ्या अचलपूर येथे देखील औषधी विक्रेते उमेश कोल्हे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सकाळी 11 वाजता श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. एकूणच शहर आणि जिल्ह्यातील परिस्थिती पाहता पोलिसांच्या वतीने अमरावती आणि अचलपूरच्या कार्यक्रमादरम्यान चोख बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.
हेही वाचा -