अमरावती - जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. गुरुवारी नव्याने 5 रुग्ण आढळून आले असून अमरावतीत आता कोरोना रुग्णांची संख्या 139 वर पोहोचली आहे. यांपैकी 59 हे कोरोना अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गुरुवारी अमरावतीत लालखडी परिसरात 24 वर्षीय महिलेला कोरोना असल्याचे समोर आले. तसेच हनुमान नगर परिसरातील 38 वर्षीय महिला, वालगाव मार्गावरील डी.एड. कॉलनी परिसरातील 39 वर्षीय महिला, अलील कॉलनी परिसरातील 56 वर्षीय महिला आणि हबीब नगर परिसरातील 32 वर्षाच्या पुरुषाला कोरोना असल्याचे गुरुवारी समोर आलेल्या चाचणी अहवालात स्पष्ट झाले आहे. अमरावतीच्या कोविड रुग्णालयात 59 जणांवर सध्या उपचार सुरू असून, 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 65 जणांनी कोरोनावर मात केली आहे.