अमरावती : अमरावती शहरात गुरुवारी दुपारी साडेचार वाजल्यापासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे. मान्सूनपूर्व हा अवकाळी पाऊस असून, सलग तीन दिवस असा अवकाळी पाऊस बरसणार आहे, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
12 जूनपासून येणार मान्सून : विदर्भात 12 ते 15 जूनपासून मान्सूनचे आगमन होणार आहे. सलग तीन दिवस अवकाळी पाऊस बरसणार आहे, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. दुपारी साडेचार वाजल्यापासून अमरावती शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
प्रचंड उकाडा : अमरावतीत तासभर मुसळधार पाऊस कोसळत असताना प्रचंड उकाडा जाणवत होता. एकीकडे मुसळधार पाऊस कोसळत असताना ढगांच्या आडून अधूनृ-मधून सूर्याचे दर्शन होत असून, ऊनही पडले आहे. एकूणच या अवकाळी पावसामुळे वातावरण बदलले असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
हेही वाचा : Maharashtra Weather Forecast : धो-धो बरसणार.. राज्यभरात 'या' ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता..