ETV Bharat / city

Tiranga Distribution Amravati अमरावतीतील सेवानिवृत्त शिक्षक देतायत नागरिकांना तिरंगा भेट - आझादी का अमृत महोत्सव

अमरावती शहरात मात्र 32 वर्षांपासून स्वातंत्र्य दिन आणि गणतंत्र दिनाच्या पर्वावर शहरातील शिक्षक राष्ट्रीय चिन्हांची Tiranga distribution Amravati भेट जिल्ह्यातील प्रत्येक शाळांमधील विद्यार्थ्यांना देत आहेत. यावर्षी विद्यार्थ्यांना त्यांनी घरावर लावण्यासाठी शेकडो झेंड्यांचे वितरण केले आहे. तर शहरातील प्रत्येक ऑटो रिक्षांवर देखील झेंडा फडकावा यासाठी ते ऑटो रिक्षा चालकांनाही तिरंगा झेंड्याचे वितरण करत आहेत.

Tiranga Distribution Amravati
Tiranga Distribution Amravati
author img

By

Published : Aug 12, 2022, 5:29 PM IST

Updated : Aug 13, 2022, 12:00 PM IST

अमरावती - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सध्या संपूर्ण देशभर हर घर तिरंगा Har Ghar Tiranga अभियान राबविले जात आहे. असे असताना अमरावती शहरात मात्र 32 वर्षांपासून स्वातंत्र्य दिन आणि गणतंत्र दिनाच्या पर्वावर शहरातील शिक्षक राष्ट्रीय चिन्हांची Tiranga distribution Amravati भेट जिल्ह्यातील प्रत्येक शाळांमधील विद्यार्थ्यांना देत आहेत. यावर्षी विद्यार्थ्यांना त्यांनी घरावर लावण्यासाठी शेकडो झेंड्यांचे वितरण केले आहे. तर शहरातील प्रत्येक ऑटो रिक्षांवर देखील झेंडा फडकावा यासाठी ते ऑटो रिक्षा चालकांनाही तिरंगा झेंड्याचे वितरण करत आहेत.

प्रतिक्रिया देताना शिक्षक

संतोषकुमार अरोरा यांचा अभिनव उपक्रम : खेळाडू असणारे संतोष कुमार अरोरा यांना देशाप्रती अत्यंत आदर आहे. 1993 मध्ये त्यांना 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या राष्ट्रीय सणाच्या पर्वावर शाळेतील विद्यार्थ्यांना छोट्या आकारातील कागदाचे राष्ट्रध्वज भेट स्वरूपात द्यावे, अशी कल्पना सुचली. 26 जानेवारी 1993 ला त्यांनी 20 रुपयाला कागदाचे एकूण 200 लहान आकारातील राष्ट्रध्वज खरेदी केले. ते शिक्षक असणाऱ्या शहरातील संत कवर राम विद्यालयात विद्यार्थ्यांना त्यांनी लहान आकारातील कागदांच्या राष्ट्रध्वजाचे वितरण केले. 26 जानेवारी 1993 पासून सुरू झालेल्या या उपक्रमाला आज तीस वर्षे झाली.

शहरातील ऑटोरिक्षांवर फडकणार राष्ट्रध्वज : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पर्वावर प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वज वितरित करण्यासह अमरावती शहरात धावणाऱ्या एकूण ऑटो रिक्षांपैकी 300 ऑटो रिक्षांचालकांना देखील ऑटो रिक्षावर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा फडकला हवा. या उद्देशाने संतोष कुमार अरोरा यांनी ऑटो रिक्षा चालकांना तिरंग्याचे वितरण केले आहे. आपल्या राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, अशा सूचना देखील त्यांनी ऑटो रिक्षा चालकांना दिल्या आहेत. शहरातील डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना यावर्षी पहिल्यांदाच राष्ट्रध्वजाचे वितरण संतोष कुमार अरोरा हे करणार आहेत. अंध विद्यार्थ्यांनी देखील आपल्या शाळेसोबतच आपल्या घरावर 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रध्वज फडकावा, असे आवाहन संतोष कुमार अरोरा यांनी केले आहे.

हेही वाचा - हर घर तिरंगा प्रचार रथावर अमरावतीत हल्ला, पंतप्रधान मोदींचे फाडले पोस्टर

Last Updated : Aug 13, 2022, 12:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.