ETV Bharat / city

MLA Ravi Rana : आमदार रवी राणा यांना अटक होणार?, अमरावतीत तणावाचे वातावरण - आमदार रवी राणा यांना अटक होणार बातमी

आज आमदार रवी राणा यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी राजापेठ उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. (MLA Ravi Rana Arrested?) तसेच, परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.

पोलीस बंदोबस्त
पोलीस बंदोबस्त
author img

By

Published : Feb 18, 2022, 1:14 PM IST

अमरावती - आज आमदार रवी राणा यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी राजापेठ उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. तसेच, परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपूल पोलिसांनी गुरुवारी रात्रीपासून बंद केला आहे. (MLA Ravi Rana) या उड्डाणपुलावर आमदार रवी राणा यांनी 12 जानेवारीला (Statue of Chhatrapati Shivaji Maharaj Amravati) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विनापरवानगी बसवला होता. हा पुतळा महापालिका प्रशासनाने काढून टाकल्यामुळे महापालिका आयुक्त आणि राणा समर्थकांमध्ये हा वाद सुरू आहे. राणा समर्थक कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांवर शाही फेकल्याप्रकरणी आमदार रवी राणा यांच्यासह एकूण अकरा जणांविरोधात गुन्हे दाखल आहेत.

व्हिडिओ

आमदार रान विरोधात गुन्हा दाखल

अमरावती महापालिकेच्या आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांना राजापेठ भुयारी मार्गाची पाहणी करण्यासाठी बोलावे ते राणा समर्थक कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाई फेकली. या प्रकाराबाबत महापालिका आयुक्तांनी राजापेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आमदार रवी राणा यांच्यासह एकूण अकरा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 11 जणांपैकी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आमदार रवी राणा हे दिल्लीवरून अमरावती येणार असल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक करण्याची तयारी केली आहे.

शिवजयंतीनिमित्त खबरदारी

राजापेठ उड्डाणपुलावर आमदार राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अनाधिकृतपणे बसलेला पुतळा महापालिकेने हटवल्यामुळे काही दिवसांपासून अमरावती शहरात तणावाचे वातावरण आहे. शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळे राणा समर्थक राजापेठ उड्डाणपुलावर काही गडबड करण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांनी राजापेठवरून बडनेरा आणि दस्तुर नगरकडे जाणारा हा उड्डाणपूल गुरुवारी रात्रीपासूनच बॅरिकेट्स लावून बंद केला आहे.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

राजापेठ उड्डाणपूल परिसरात गत तीन दिवसांपासून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी ही राजापेठ परिसरा तैनात करण्यात आली आहे. राजापेठ चौक, झेंडा चौक, कंवरनगर, शंकरनगर या भागात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

हेही वाचा - कुमार विश्वास यांच्या आरोपांवर केजरीवाल गप्प का? राहुल गांधींचा सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.