अमरावती यवतमाळ जिल्ह्यात पाच वर्षांपूर्वी शेतात फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकाच्या Five Years Ago Hundreds of Farmers were Poisoned फवारणीमुळे शेकडो शेतकऱ्यांना विषबाधा झाली Five Years Ago Hundreds of Farmers were Poisoned होती. यापैकी 23 जण दगावले होते. या गंभीर प्रकरणात यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वित्झर्लंड येथील सिजेंटा Pesticide Company Sygenta या ॲग्रो केमिकल कंपनी विरोधात स्वित्झर्लंड येथील न्यायालयात दाखल केलेला खटला लढण्यासाठी स्वित्झर्लंड न्यायालयाकडून कायदेशीर मदत केली जाणार, असा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. यामुळे आता यवतमाळ जिल्ह्यातील पीडित शेतकऱ्यांना न्याय Farmers of Yavatmal District will Get Justice मिळेल, अशी आशा पल्लवीत झाली आहे.
असे आहे संपूर्ण प्रकरण यवतमाळ जिल्ह्यात 2017 मध्ये कपाशीच्या पिकावर कीटकनाशकांची फवारणी करताना शेकडो शेतकऱ्यांना गंभीर विषबाधा झाली होती. विषबाधा झालेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी 23 जणांचा मृत्यू झाला होता. या गंभीर प्रकाराबाबत एका शेतकऱ्याने आणि मृतांपैकी दोघांच्या पत्नीने विषबाधेला जबाबदार असणाऱ्या स्वित्झर्लंड येथील सिजेंटा या ॲग्रो केमिकल कंपनी विरोधात दावा दाखल केला.
स्वीस सरकारच्या योजनेतून मिळणार आर्थिक मदत यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वित्झर्लंड न्यायालयात दाखल केलेल्या दाव्याबाबत आता स्वित्झर्लंड न्यायालयाने कायदेशीर मदत मंजूर करण्याचा निर्णय घेतला असून याचा अर्थ फिर्यादींना स्वित्झर्लंड सरकारच्या योजनेद्वारे आर्थिक मदत मिळेल असे कीटकनाशक ॲक्शन नेटवर्क या स्वयंसेवी संस्थेचे नरसिम्हा रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे. यवतमाळ येथील शेतकऱ्यांना स्वित्झर्लंड येथील न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी कीटकनाशक ॲक्शन नेटवर्क या संस्थेने मदत केली आहे.
कंपनीने नाकारला होता दोषारोप यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी न्यायालयात दावा करताना दोन शेतकऱ्यांचा मृत्यू आणि विषबाधेतून बचावलेल्या शेतकऱ्यांच्या आरोग्याच्या समस्या पोलो या ब्रँड नावाच्या सिजेंटा कीटकनाशकांपैकी एकामुळे उद्भवल्या आहेत. शेतकऱ्यांनी केलेला दोषारोप सिजेंटा कंपनीने नाकारला होता. कीटकनाशक ॲक्शन नेटवर्कच्या वतीने यवतमाळ मधील विषबाधांची 96 प्रकरणे पोलिसांकडे दाखल करण्यात आली होती. यानंतर याचिकाकर्त्यांनी जून 2021 मध्ये बसेल येथील दिवाणी न्यायालयात हा खटला दाखल केला होता.