अमरावती - आपल्या कुटुंबाच्या विकासात आपलाही हात भार लगाव या उद्देशाने अनेक महिला आपला एखादा छोटासा व्यवसाय, उद्योग सुरु करतात. मात्र, हा व्यवसाय नेमका करायचा कसा? तो टिकवायचा कसा याबाबतचे ज्ञान अनेकांना नसते. अशाच सुरु होण्यापूर्वीच शुन्यात जमा होणाऱ्या व्यवसायांना, उद्योगांना चालना मिळावी, या उद्देशाने दोन वर्षापासून स्वयंसिद्धा उद्योजकता विकास अभियानची मोठी मदत होत आहे. यामुळे अमरावती शहरातील अनेक महिलांना आपला स्वतःचा व्यवसाय उरावर आणण्यासह स्वतः यशस्वी उद्योजिका, व्यवसायिक म्हणून अनेकींना सन्मान मिळतो आहे.
हेही वाचा - महिला दिन विशेष: मराठी भाषेच्या उन्नतीसाठी बंगाली महिलेचा पुढाकार; काय केलं ते वाचा सविस्तर....
अमरावती एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर यांच्या संकल्पनेतून स्वयंसिद्धाची स्थापना करण्यात आली. मोनिका उमाक आणि काही धाडसी महिलांनी समोर येऊन समाजातील स्त्रियांमध्ये आपलाही स्वतःचा व्यवसाय असू शकतो याबाबत विश्वास निर्माण केला. यामुळेच आज काही महिला स्वतःची खानावळ चालवून स्वयंसिद्धा झाल्या आहेत तर अनेकांचे शहरात चांगले बुटीक आहे. काहींच्या पापड, लोणचे, शेवाया कानाकोपर्यात पोहोचल्या आहेत. एकूणच पहिल्या व्यवसायासाठी धडपडणार्या अनेक महिला या आज 'स्वयंसिद्धा' झाल्या आहेत. याचे श्रेय खऱ्या अर्थाने स्वयंसिद्धा उद्योजकता विकास अभियानाला आहे.
हेही वाचा - धसका 'कोरोना' विषाणूचा; शरद पवारांचा जळगाव दौरा स्थगित