अमरावती - कोरोना काळात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अभ्यासक्रम ऑनलाईन घेतला. आता परीक्षाही ऑनलाईन घ्यावी या मागणीसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर धडकलेल्या विद्यार्थ्यांनी 'कुलगुरू बाहेर या' अशी घोषणाबाजी सुरू केली.
राज्यात सत्तेवर असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस प्रणीत एनएसयूआय, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना, युवा सेना आणि प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने विद्यापीठाची परीक्षा ऑफलाईन न घेता ऑनलाईन व्हावी यासाठी आंदोलन छेडण्यात आले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र झाले होते. परीक्षा ऑनलाईन व्हावी या मागणीसाठी धडकलेल्या मोर्चाला विद्यापीठात प्रवेश दिले जात नव्हते. यावेळी कुलगुरू बाहेर या, अशा जोरदार घोषणा आंदोलकांच्या वतीने केल्या करण्यात आल्या.
हेही वाचा - Exam Fever 2022 : राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन; निर्णयाचा चेंडू शासन दरबारात