ETV Bharat / city

Amravati Blind Family : एकाच कुटुंबात चार दृष्टीहीन; रोजगाराचे साधन नसल्याने जगण्यासाठी धडपड - Story of Family of Four Blind People in One Family

अमरावती येथील अंजनगावा सुर्जी येथील एकाच कुटुंबातील चार नेत्रहीनांची जगण्यासाठीची धडपड पाहण्यात आली आहे. या कुटुंबात चार जण अंध असल्याने ( Amravati Four Blind People Struggling to Survive ) त्यांना रोजगारासाठी जीवाच्या आंकाताने प्रयत्न करावे लागत आहे. त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी वृद्ध वडिलांवर असल्याने या कुटुंबाला शासनाच्या ( Blind Family From Anjangaon Surjee in Amravati ) मदतीची गरज आहे.

Amravati Blind Family
अमरावती अंध कुटुंब
author img

By

Published : Sep 25, 2022, 12:45 PM IST

Updated : Sep 25, 2022, 3:54 PM IST

अमरावती : रोजगाराचे कुठलेही साधन नाही, ( Story of Family of Four Blind People in One Family ) हाताला कुठलेही काम नाही आणि शासनाकडूनदेखील मदत मिळत नसताना एकाच कुटुंबात राहणाऱ्या चार नेत्रहीनांना जगण्यासाठी मोठी धडपड करावी लागत ( Amravati Four Blind People Living Together ) आहे. ( Amravati Four Blind People Struggling to Survive ) ज्या वयात आई-वडिलांचा आधार व्हायचा त्या वयातदेखील वडिलांच्या भरवशावर उदरनिर्वाह करण्याची दुर्दैवी वेळ या नेत्रहीनांवर ( Blind Family From Anjangaon Surjee in Amravati ) आली आहे.

अंधाराप्रमाणेच भविष्यदेखील अंधारात : रस्त्यावर गोळ्या बिस्कीट विकणे तसेच रेल्वे गाडी गोळ्या बिस्कीट विकणे हा छोटासा व्यवसाय करण्याचा प्रयत्न या नेत्रहीनांचा असला तरी त्यांना त्यातून फारसा आर्थिक लाभ होत नाही. एकूणच आपल्या आयुष्यात असणाऱ्या अंधाराप्रमाणेच भविष्यदेखील अंधारात असल्याची खंत अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी असणारे या नेत्रहीन व्यक्तींनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.

रोजगाराचे साधन नसल्याने जगण्यासाठी धडपड

अशी आहे या कुटुंबाची कहाणी : अंजनगाव सुर्जी येथे मजुरी काम करणारे सीताराम राऊत यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी अपत्य आहेत. यापैकी पुंजाजी आणि ज्योती या दोघेही जन्मतः नेत्रहीन आहेत. गरिबीच्या परिस्थितीतून सीताराम राऊत यांनी आपल्या तिन्ही मुलांना वाढवले. आज तिघांचेही लग्न झाले आहे यापैकी पुंजाजीची पत्नी प्रमिला हीदेखील नेत्रहीन असून ज्योतीचे पती देविदास नारनवरे हेदेखील नेत्रहीन आहेत. या कुटुंबात पुंजाजी त्याची पत्नी प्रमिला पुंजाजीची बहिण ज्योती आणि जावई देविदास नारनवरे हे चारही जण एकाच ठिकाणी राहत असून आपल्या संसाराच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना प्रचंड कष्ट उपसावे लागत आहे.

वृद्धावस्थेत सीताराम राऊत करतात मजुरीचे काम : मुलांची ही अवस्था पाहता आजदेखील वृद्धावस्थेत सीताराम राऊत हे मजुरीचे काम करतात. पुंजाजी आणि देविदास हे गोळ्या बिस्किट विकत असले तरी अंजनगाव सुर्जीसारख्या छोट्याशा गावात त्यांच्या या व्यवसायातून उदरनिर्वाह करणे शक्य होत नाही. यामुळेच देविदास नारनवरे आणि ज्योती नारनवरे हे दोघे अमरावती रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या रेल्वे गाडीत गोळ्या-बिस्कीट विकतात. हे कामदेखील सोपे राहिले नाही. अतिशय कमी मोबदला गोळ्या-बिस्किट विकून मिळतो. मात्र, दुसरा पर्याय नाही, असे पुंजाजी राऊत 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.

गरिबी आणि अशिक्षित असल्यामुळे मोठी अडचण : जन्मतः दृष्टीहीन असले तरी गरिबी आणि अशिक्षित असल्यामुळे उदरनिर्वाहासाठी सर्वात मोठी अडचण ठरत असल्याचे पुंजाजी राऊत आणि त्यांच्या पत्नी प्रमिला राऊत प्रामाणिकपणे सांगतात. पुंजाजी राऊत हे परतवाडा येथील अंध विद्यालयात इयत्ता चौथीपर्यंत शिकले. त्यानंतर घरातील गरीब परिस्थितीमुळे गोळ्या बिस्किट विकण्याचे काम त्यांनी सुरू केले. प्रमिला या बारावीपर्यंत शिकल्या असून त्यांना टायपिंग आणि संगणकाचे ज्ञान आहे. मात्र, अंजनगाव सुर्जीसारख्या गावात त्यांना कुठल्याही स्वरूपात रोजगार उपलब्ध होत नाही, अशी परिस्थिती आहे. पुंजाजी आणि प्रमिला या दोघांना सहा वर्षांची मुलगी आहे. मुलगी चांगली शिकावी अशीच या दोघांची अपेक्षा आहे.

वीज देयक भरायचीही सोय नाही : अंजनगाव सुर्जी येथे नातेवाईकाने दिलेल्या घरात पुंजाजी राऊत, प्रमिला राऊत, देविदास नारनवरे, ज्योती नारनवरे त्यांची मुले आणि वृद्ध आई-वडील राहतात. दर महिन्याला येणारे वीज देयक आणि पाण्याचे देयक भरण्यासाठीदेखील पैसे नसतात. शासनाच्या वतीने आम्ही दृष्टीहीन आहोत, म्हणून हजार रुपये महिन्याला मिळतात.

शासनाने आम्हाला मदत करावी : याव्यतिरिक्त गोळ्या बिस्कीट विकून आम्हाला खूप छोटीशी रक्कम मिळते आणि वृद्ध वडील आजदेखील कष्ट करून चार पैसे घरात आणतात, अशी वाईट परिस्थिती आमची आहे. शासनाने आम्हाला मदत करावी. दर महिन्याला मिळणारी रक्कम वाढवून द्यावी, आम्हीच नव्हे तर अतिशय कठीण परिस्थितीत जगणाऱ्या सर्व दिव्यांग व्यक्तींबाबत शासनाने सकारात्मक विचार करून आमचे जगणे सुकर होईल यासाठी पाऊल उचलावे, अशी अपेक्षा पुंजाजी राऊत आणि त्यांच्या पत्नी प्रमिला राऊत यांनी व्यक्त केली.

Last Updated : Sep 25, 2022, 3:54 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.