अमरावती : माझे पती अमरावती येथे एसटी महामंडळ मध्ये सहाय्यक यांत्रिक पदावर कार्यरत आहे.पगार कमी असल्यामुळे ते देखील दोन महिन्यापासून या एसटी कर्मचारी यांच्या दुखवट्यात सहभागी झाले आहे.त्यामुळे शासनाने त्यांचाही अडीच महिन्यांचा पगार दिला नाही.त्यामुळे आमच्या कुटुंबाचे सध्या वाईट दिवस सुरू आहे.लोकांच कर्ज आमच्यावर वाढत आहे.घरात एक पैसाही आता उरला नाही. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आता आमच्यासमोर आहे. आता जगावं तरी कस असा प्रश्न डोळ्यासमोर आव आसून उभा आहे.
कमावणारे फक्त एकटे माझे पती आहे. त्यांचीही कमाई थांबली आहे. मागील दोन महिन्यात आमच्यावर अनेक संकट आले. एक प्रसंग तर असा होता, की आमचं सहा महिन्यांच बाळ आणि एक तीन वर्षाचा मुलगा हे आजारी पडले. तेव्हा त्यांना रुग्णालयात न्यायलाही आमच्याकडे पैसे नव्हते. ही व्यथा सांगतानाच फ़्रेजपुरा मध्ये राहणारे एसटी कर्मचारी तुषार मेहश्रे यांची पत्नी शितल मेहश्रे यांना अश्रू अनावर झाले. सध्या एसटी संपामुळे मेहश्रे यांच्यासारखे एसटी कर्मचारी कुटुंबाची हालाखीची परिस्थिती सुरू आहे.
एसटी कुटुंबाची व्यथा
अमरावतीच्या फ्रेझरपुरा परिसरात राहणारे तुषार मेहश्रे हे 20 वर्षांपासून एसटी महामंडळामध्ये सहाय्यक यांत्रिक कारागीर म्हणून कार्यरत आहे. .त्यांचे वडीलही एसटी महामंडळमध्ये कार्यरत होते. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर अनुकंपामध्ये ते एस टी महामंडळमध्ये नोकरीला लागले. सुरुवातीला पाच वर्ष साडेचार ते पाच हजार रुपयांपर्यंत त्यांनी एसटी महामंडळात नोकरी केली. आता त्यांना एसटी महामंडळात मूळ वेतन बावीस हजार रुपये आहे. परंतु घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी बहिणीच्या लग्नासाठी तसेच आईच्या आजारपणासाठी कर्ज देखील घेतले आहे. या कर्जाचे हप्ते त्यांच्या पगारातून कमी होत आहे .त्यामुळे केवळ अकरा हजार रुपये पगार त्यांच्या हाती येतो. या अकरा हजार रुपयांमध्ये कुटुंब कसे चालणार ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे एसटी महामंडळचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी तुषार मेहश्रे हे देखील या संपात सहभागी आहे. इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे तुषार यांचाही अडीच महिन्याचा पगार झाला नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे घरात अनेक अडचणी असून कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे.
तुषार यांच्या आई वयोवृद्ध आहे. आईला दर महिन्याला रूग्णालयात न्यावं लागतं तिच्या औषध पाण्यालाही आता पैसे उरले नाही त्यामुळे वेळेवर तिच्यावर उपचार करता येत नाही. सोबतच सहा महिन्याचे बाळ असल्याने त्याचाही दवाखाना करावा लागतो. परंतु त्याच्या दवाखान्यासाठी ही पैसे राहत नाही. त्यामुळे लोकांना उसनवारीने पैसे मागावे लागतात. असे एक ना अनेक प्रश्न मे या कुटुंबानं समोर उभे राहिले आहेत.