अमरावती - नागपूर मार्गावर नांदगव पेठ एमआयडीसीमध्ये श्री बालाजी पॉलिमरला उष्णतेमुळे भीषण आग लागली. ही आग आटोक्यात येण्यासाठी ४ तास लागले. या आगीत श्री बालाजी पॉलिमरचे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले. या कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये प्रफुल पटेल यांची सवर्डी येथील प्लॉट क्रमांक २८ मध्ये श्री बालाजी पॉलिमर ही प्लास्टिक रिसायकलिंगची कंपनी आहे. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास श्री बालाजी पॉलिमर कंपनीला भीषण आग लागली. ही आग विझविण्यासाठी रतन इंडिया कंपनीच्या अग्निशामक दलाच्या १ अमरावती महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या ४ बंबाद्वारे पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यात आली. कंपनीत साठून ठेवलेल्या प्लास्टिकला आग लागली असल्याने ही आग पूर्णपणे विझवण्यासाठी सुमारे ४ तास लागले. त्यासाठी अग्निशामक दलाने जेसीबीच्या सहाय्याने कंपनीची भिंतही पाडली.
नांदगावपेठ एमआयडीसीमध्ये कायमस्वरूपी अग्निशामक दल असावे, अशी मागणी गेल्या ३ वर्षांपासून आम्ही करत आहोत. नंदगवपेठ एमआयडीसी अमरावती महापालिकेच्या हद्दीत येत नसल्याने आम्ही काही करू शकत नाही, असे उत्तर महापालिका आयुक्त देतात. नंदगावपेठ एमआयडीसिमध्ये एक वर्षात ११ कंपन्यांना आग लागली. यापैकी ८ कंपन्यांचे नुकसान एक कोटीच्या घरात असल्याचे नंदगवपेठ एमआयडीचीचे अध्यक्ष विनायक श्रीवास्तव यांनी सांगितले.