अमरावती: स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या आणि राज्यातील द्वितीय क्रमांकाची शिक्षण संस्था असलेल्या श्री शिवाजी शिक्षण कार्यकारी परिषदेच्या ९ पदांकरिता आज निवडणूक होत Shree Shivaji Education Society Election आहे. एकूण २१ उमेदवार रिंगणात असून या २ अध्यक्षपदासाठी, उपाध्यक्षपदासाठी ७, कोषाध्यक्ष पदासाठी २ तर सभासदासाठी दहा उमेदवार भाग्य आजमावत Election for posts of Executive Council आहेत.
पाच केंद्रावर होणार मतदान आज सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात मतदान प्रक्रिया पार पडेल. सायंकाळी ७:३० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल त्यानंतर लगेच निकाल जाहीर केला जाणार आहे. पाच केंद्रावर मतदान होणार आहे.
हर्षवर्धन देशमुख की नरेशचंद्र ठाकरे संस्थेच्या श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात मतदान होणार Shree Shivaji Education Society Election today आहे. या विकास विरुद्ध प्रगती पॅनलमध्ये थेट लढत होणार आहे. संस्थेचे ७७४ आजीवन सभासद श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष कोण ? नरेंद्रचंद्र ठाकरे की हर्षवर्धन देशमुख याचा फैसला आज घेतील. संस्थेकडून सुमारे १०० अधिकारी कर्मचाऱ्यावर जबाबदारी सोपविण्यात आली असून ८ सप्टेंबर पासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे.
दोन दिग्गजांमध्ये रंगणार सामना श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांचे नेतृत्वाखाली प्रगती पॅनल तर माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे विकास पॅनल परस्पराविरुद्ध मैदानात उभे आहेत. दोन्ही पॅनल मधील अध्यक्ष पदाकरिता २, उपाध्यक्षपदाकरिता ६, कोषाध्यक्ष २, कार्यकारणी सदस्य पदाकरिता ८ असे एकूण 18 तर ३ अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहे. अपक्षमध्ये डॉ. विठ्ठल वाघ, उपाध्यक्ष पदाकरिता आनंद देशमुख व डॉ. प्रमोद झाडे हे सदस्य पदाकरिता मैदानात आहेत. एका उमेदवाराला ९ मते देण्याचा अधिकार असणार आहे. आधार कार्ड, संस्थेचे ओळखपत्र यावर मतदान करता येणार आहे.
७७४ मतदार बजावणार मतदानाचा अधिकार संस्थेकडून डिसेंबर २०२१ मध्ये ८१४ मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. यातील ४० मतदारांचे निधन झाल्याने ७७४ मतदार मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र आहेत. संस्थेची वार्षिक उलाढाल ६०० कोटी रुपयांची आहे . ती या पूर्वी ३०० कोटी होती. ७७४ मतदार ६०० कोटींच्या नियोजन कर्त्यांची निवड करणार आहे. बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. Shree Shivaji Education Society Election today for posts of Executive Council