ETV Bharat / city

Anant Gudhe : संभ्रमात असलेले शिवसैनिक प्रतिक्रिया कशी देणार ? माजी खासदार अनंत गुढे यांचा सवाल - Shivsainik In Confusion

शिवसेनेचा मोठा गट बंडखोरी करून वेगळा झाला असे असताना अमरावतीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची कुठलीच प्रतिक्रिया का उमटली नाही ( Shivsainiks Did Not React In Amravati ) हा मोठा प्रश्नच आहे, असे शिवसेनेचे नेते आणि अमरावतीचे माजी खासदार अनंत गुढे ( Amaravati Shivsena Leader Anant Gudhe ) यांनी म्हटले आहे. पक्षाने जिल्ह्याची जबाबदारी ज्या व्यक्तींकडे दिली आहे ते सर्व पदाधिकारी गप्प असल्यामुळे जिल्ह्यातील जुने शिवसैनिक संभ्रमात ( Shivsainik In Confusion ) आहेत. शिवसैनिकांनी आपण नेमके कुठल्या गटात आहे हे जाहीर करायला हवे होते, असे देखील अनंत गुढे 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले.

EX MP Amarawti Anant Gudhe
EX MP Amarawti Anant Gudhe
author img

By

Published : Jun 28, 2022, 7:42 PM IST

अमरावती - अमरावती लोकसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा खासदार राहिलेले आनंद पुढे ( Amaravati Shivsena Leader Anant Gudhe ) यांनी सांगितले की, जी माणसं ऑटो रिक्षा चालवत होती, पान टपरी चालवत होते अशा व्यक्तींना शिवसेनेने मोठे केले. असे असतानाही या लोकांनी बंडखोरी करणे योग्य नव्हते. यापूर्वी देखील शिवसेनेत फूट पडली होती. छगन भुजबळ शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. आज छगन भुजबळ दिसत आहेत, मात्र त्यांच्यासोबत गेलेले शिवसैनिक कुठेच दिसत नाहीत. नारायण राणे हेदेखील शिवसेनेतून फुटून बाहेर निघाले. आज नारायण राणे दिसत आहेत. मात्र त्यांच्यासोबत गेलेले अकरा जण कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे या बंडखोरीचाही मोठा फायदा बंडखोरांना मिळेल, असे मला वाटत नाही. आता अडीच वर्षासाठी बंडखोर सत्तेत निश्चितपणे येतील. मात्र अडीच वर्षानंतर निवडणुकीला सामोरे जाताना जनता या बंडखोरांना निश्चितच धडा शिकवणार, असे देखील अनंत गुढे यांनी म्हटले आहे.

माजी खासदार अनंत गुढे

पक्षसंघटनेतच्या कारभारावरही घेतला अक्षेप - पक्षप्रमुखांनी देखील पक्षाकडे तसेच पक्ष संघटनेकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही असा आक्षेप देखील अनंत गुढे यांनी नोंदविला. मुंबईनंतर, संभाजीनगर अमरावती या ठिकाणी शिवसेनेचे मोठे कॅडर होते. आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला शिवसैनिकच आहे. अमरावती जिल्ह्यात मी खासदार असताना भाजपचे तीन आमदार तसेच शिवसेनेचे तीन आमदार होते. जिल्हा परिषद, महानगरपालिका या ठिकाणी आमचेच संख्याबळ अधिक होते. मात्र आता परिस्थिती अत्यंत विपरीत आहे. जिल्ह्यातील शिवसैनिक इतक्या मोठ्या धक्कादायक प्रकरणानंतरही समोर येऊन बोलायला तयार नाहीत. पक्षाने मला अमरावती जिल्ह्याची जबाबदारी दिली असती तर अमरावती जिल्ह्यात आज निश्चितपणे झाल्या प्रकाराबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटलेली दिसली असती. मी आज देखील जिल्ह्यात शिवसेना मोठ्या ताकदीने उभी करू शकतो. मात्र जे कार्यकर्ते तळमळीने काम करू इच्छितात त्यांना पक्ष जबाबदारीच देत नाही अशी खंत अनंत गुढे यांनी व्यक्त केली.

बंडखोरीची साधी कल्पना नसणेही ही गंभीर बाब - रोज सकाळी आमचे नेते टीव्हीसमोर येऊन बोलतात. मात्र त्यांना पक्षात इतके मोठे वादळ घोंगावत आहे याची साधी कल्पना नसणे ही गंभीर बाब आहे. इतक्या मोठ्या संख्येने आमदार फुटणे, सगळीच्या सगळी शिवसेना एका बाजूला जाते आहे याची साधी पुसटची कल्पना देखील येऊ नये याबाबत देखील अनंत गुढे यांनी पक्षाच्या नेत्यांबाबत खेद व्यक्त केला.

काँग्रेस-राष्ट्रवादी सोबतची युती मला आवडली नाही - 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेला 63 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी शिवसेनेने तटस्थ राहायला हवे होते. भाजपला पुरेसे बहुमत त्यावेळी नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपचे सरकार जास्त काळ टिकले देखील नसते. त्यावेळी शिवसेना तटस्थ राहिली असती तर राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष मोठे झाले नसते. देवेंद्र फडणवीस देखील पाच वर्ष कायमस्वरूपी मुख्यमंत्री नसते. राज्यात मध्यावधी निवडणुका लागल्या असत्या आणि शिवसेनेचे शंभर ते सव्वाशेच्यावर आमदार निवडून आले असते. आता 2019 मध्ये देखील अशीच परिस्थिती होती. युतीमध्ये लढून देखील आमचे पटले नाही तर आम्ही तटस्थ राहायला हवे होते. एक गोष्ट खरी आहे की मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात अतिशय चांगले काम केले आहे. ते लोकांच्या मनामध्ये भरले आहेत. काही कुठे कमी जास्त झाले असेल मात्र लोकांच्या मनामध्ये स्वच्छ प्रतिमेचा कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. या प्रतिमेचा फायदा शिवसेनेला भविष्यात नक्कीच मिळेल. मात्र शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून स्थापन केलेली सत्ता मला देखील आवडली नाही. यापुढे शिवसेनेने एकला चलो चा निर्णय घ्यायला हवा असे देखील आनंद गुढे म्हणाले.

हेही वाचा - ED second summon to Sanjay Raut : संजय राऊत यांना ईडीची पुन्हा नोटीस, एक जुलैला चौकशीसाठी बोलावले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.