ETV Bharat / city

अमरावती जिल्ह्यात शाळा पुन्हा सुरू, ऑनलाईन अभ्यासाचाही पर्याय - अमरावती शाळा पुन्हा सुरू

कोरानामुळे बंद असलेल्या अमरावती शहर आणि जिल्ह्यातील शाळा पुन्हा एकदा आजपासून सुरू झाल्या आहेत. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शाळा अद्यापही बंद असून केवळ पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा आजपासून सुरू ( School restarted in Amravati district ) झाली आहे.

School restarted in Amravati district
अमरावती शाळा पुन्हा सुरू
author img

By

Published : Feb 8, 2022, 3:22 PM IST

अमरावती - कोरानामुळे बंद असलेल्या अमरावती शहर आणि जिल्ह्यातील शाळा पुन्हा एकदा आजपासून सुरू झाल्या आहेत. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शाळा अद्यापही बंद असून केवळ पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा आजपासून सुरू झाली ( School restarted in Amravati district ) आहे. शाळा सुरू झाली असली तरी, ऑनलाईन अभ्यासाचा पर्यायही विद्यार्थ्यांसाठी खुला ठेवण्यात आला आहे.

माहिती देताना आदर्श शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका स्वामिनी आळशी

हेही वाचा - Lata Mangeshkar Passed Away : लता मंगेशकर यांच्या निधनावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

50 टक्के विद्यार्थ्यांनाच प्रवेश

कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक वर्गात 50 टक्के विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात आला आहे. एक दिवस आड 50 टक्के विद्यार्थ्यांना शाळेत शिकवले जाणार असून, यासोबतच घरी असणार्‍या पन्नास टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाणार असल्याची माहिती आदर्श शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका स्वामिनी आळशी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. शिक्षण विभागाकडून आलेल्या मार्गदर्शक तत्वानुसारच शाळेत खबरदारी घेतली जात असल्याचेही त्या म्हणाल्या.

कोरोना नियमांचे पालन अनिवार्य

अमरावती जिल्ह्यात अद्यापही कोरोना रुग्ण आढळत असून शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोरोना नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. जिल्ह्यातील सर्व शाळेतील खोल्या सॅनिटाईज करण्यात आल्या आहेत.

विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंद

सातत्याने शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी पालकांकडून होत होत्या. आजपासून शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये आनंद झळकत होता.

1 डिसेंबरलाही सुरू झाल्या होत्या शाळा

या शैक्षणिक वर्षात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे समोर येताच संपूर्ण राज्याप्रमाणे जिल्ह्यातील शाळा 1 डिसेंबर रोजी सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, पुन्हा एकदा राज्यात कोरोना रुग्ण वाढायला लागल्यामुळे महिनाभरातच शाळा बंद करण्यात आल्या होत्या. आता राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. अमरावती जिल्ह्यात सध्या घडीला 1 हजार 249 कोरोना रुग्ण असून यापैकी लहान मुलांची संख्या ही शंभर ते दीडशेच्या घरात आहे. मात्र, लहान मुलांवर कोरोनाचा कुठलाही गंभीर परिणाम दिसून येत नसल्यामुळे शाळा सुरू करण्यास कुठलीही अडचण नाही, असे बालरोग तज्ज्ञ संघटनेने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - Chhatrapati Shivaji Maharaj Statue : राजापेठ उड्डाणपूल येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसणारच, आमदार रवी राणा यांनी राज्यपालांनाही दिली माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.