ETV Bharat / city

कोरोनाला काय घाबरायचे, हा तर डॉक्टरांचा नालायकपणा - संभाजी भिडे

कोरोना हा केवळ आणि केवळ डॉक्टरांचा नालायकपणा ( Sambhaji Bhide comment on doctors ) आहे, असे विधान श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी अमरावतीत केले. त्यांच्या या वक्तव्याबाबत शासनाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

Sambhaji Bhide comment on doctors
संभाजी भिडे वक्तव्य डॉक्टर
author img

By

Published : Mar 1, 2022, 5:52 PM IST

अमरावती - नाका तोंडाला मास्क लावणे हा फालतूपणा आहे. तरुणांनी नाक तोंड असेच झाकून ठेवणे योग्य दिसत नाही. कोरोनाला अजिबात घाबरू नका. कोरोना हा केवळ आणि केवळ डॉक्टरांचा नालायकपणा ( Sambhaji Bhide comment on doctors ) आहे, असे विधान श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी अमरावतीत केले. संभाजी भिडे यांच्या वक्तव्याबाबत शासनाने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

बोलताना संभाजी भिडे आणि आयएमएचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सुभाष पिंगळे

हेही वाचा - Rajapeth Flyover Renaming : अमरावतीच्या राजापेठ पुलाचे नामांतर, आता 'या' नावाने ओळखला जाणार राजापेठ उड्डाण पूल

व्याख्यानादरम्यान वादग्रस्त विधान

अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपुलाच्या नामकरण सोहळ्यासाठी संभाजी भिडे सोमवारी अमरावतीत आले होते. या कार्यक्रमापूर्वी चुनाभट्टी परिसरातील ओस्वाल भवन येथे संभाजी भिडे यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाला दीडशे ते दोनशे युवक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी लावण्यात आलेल्या ध्वनी यंत्रणेचा आवाज कमी ठेवावा, अशी सूचना संभाजी भिडे यांनी वारंवार केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यात त्यांचे वडील शहाजी महाराज यांचे मोलाचे महत्व असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या व्याख्यानादरम्यान अनेकदा संभाजी भिडे यांचे बोलण्यावरील नियंत्रण सुटत होते. या वेळी व्याख्यान ऐकणार्‍या एका तरुणाच्या तोंडाला मस्क होता. या युवकाला नाका तोंडाला बांधलेला कपडा त्वरित काढून टाक, अशी सूचना करीत कोरना वगैरे काही नाही, हा केवळ डॉक्टरांचा नालायकपणा आहे, असे वादग्रस्त विधान संभाजी भिडे यांनी केले. कोरोना थोतांड आहे. डॉक्टर हे लुटारू असून त्यांच्याजवळ कधीही जाऊ नये असेसुद्धा संभाजी भिडे म्हणाले.

आयएमएने केली कारवाईची मागणी

दरम्यान संभाजी भिडे यांनी डॉक्टरांबाबत उच्चारलेल्या शब्दाबाबत आयएमएच्या अमरावती शाखेच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला. कोरोना काळात डॉक्टरांनी केलेले प्रयत्न हे अमरावतीकरांना ठाऊक आहे. कोणीही व्यक्ती डॉक्टरांबाबत चुकीचे वक्तव्य करीत असेल तर, हा प्रकार डॉक्टर आणि रुग्णांमध्ये अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, कोरोना काळातील वास्तविकता अमरावतीकर जाणून असल्यामुळे अशा चुकीच्या वक्तव्याचा अमरावतीकरांवर कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही, असा विश्वास आयएमएच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. आयएमएचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सुभाष पिंगळे यांनी असे वक्तव्य म्हणजे डॉक्टर आणि रुग्णांच्या संबंधात विष कालवण्यासारखे आहे. शासनाने या वक्तव्याची दखल घेऊन त्वरित कारवाई करावी, अशी मागणी डॉ. सुभाष पिंगळे यांनी केली.

हेही वाचा - Ravi Rana on Yashomati Thakur : माझ्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांचे हिशोब चुकते होणार - रवी राणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.