अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांचा अवमान केल्याच्या विरोधात, आज सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी (Retired police officers and employees) मोठ्या संख्येने पोलीस आयुक्तालयावर (meet Amravati Police Commissioner) धडकले. यावेळी खासदार नवनीत राणा यांच्यावर कारवाई करण्याची (demanded action against MP Navneet Rana) मागणी, त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली.
हा प्रकार खासदारांना शोभत नाही : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची पोलिसांसोबत नेहमीच असभ्य वागणूक असते. घरातून पळालेल्या युवतीच्या प्रकरणाला लव-जिहादचे वळण देऊन;समाजात तेढ निर्माण करणे, यासह पोलिसांचा सातत्याने अपमान करणे, हा प्रकार खासदारांना शोभत नाही. त्यांच्या विरोधात योग्य अशी कारवाई व्हावी, अशा मागणीसह आज सेवानिवृत्त पोलिस अधिकारी आणि कर्मचारी संघटनेने, पोलीस आयुक्तालयावर धडक दिली.
पोलीस आयुक्तांची साधला संवाद : खासदार नवनीत राणा यांची पोलिसांसोबतची ही वागणूक योग्य नाही. त्या सातत्याने अमरावतीचे पोलिस आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांचा अपमान करतात. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे कर्तव्य खासदार नवनीत राणा यांना ठाऊक नाही. बारा ते पंधरा तासापर्यंत कर्तव्य बजाविणाऱ्या पोलिसांना नेमक्या किती वेदना सहन कराव्या लागतात, याची जाणीव खासदार नवनीत राणा यांना नाही. पोलिसांच्या प्रति त्यांचे वागणे योग्य नसून; त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
पोलिसांचे मनोधैर्य खच्चीकरणाचा प्रयत्न : खासदार राणा यांनी राजकीय हेतू साध्य करण्यासाठी पोलीसांवर खोटे नाटे आरोप करून पोलीसांचे मनोधैर्य खचविण्यासाठी त्यांच्या पदाचा गैरवापर केला आहे. त्यांच्या अशा ह्या कृत्यामुळे पोलीस अधिकारी, अमलदार यांच्यावर आलेल्या मानसीक तणावामुळे, त्यांचे संतुलन बिघडण्याची शक्यता असून, हृदय विकार व आत्महत्या होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासदार नवनीत राणा यांच्या गैरवर्तणुकीमुळे पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या परिवाराच्या भावना दुखवल्यामुळे, ते सर्व व्यथीत झाले आहे. त्यांच्यात भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आपण या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. नमुद प्रकरणी खासदार नवनीत राणा व त्यांच्या कार्यकत्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करून कायद्याचे उल्लघंन केले आहे. करिता त्यांच्या विरूध्द कलम १८६, अ भा.द.वि. सह-कलम १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम व इतर कलमान्वये गुन्हा नोंदवून तात्काळ कायदेशिर कार्यवाही व्हावी, असे निवेदन यावेळी देण्यात आले.
पोलीस आयुक्तांनी साधला संवाद : खासदार नवनीत राणा यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी पोलीस आयुक्तालयावर धडकलेल्या सेवानिवृत्त पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भेटण्यासाठी स्वतः पोलीस आयुक्त आपल्या दालनातून बाहेर आल्या. यानंतर पोलीस आयुक्तांनी सर्वांना सभागृहात बसण्याची विनंती केली. त्यानंतर प्रत्येकाशी वैयक्तिक संवाद साधून सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत आणि खासदार नवनीत राणा यांच्या बाबतचे त्यांचे म्हणणे जाणून घेतले. सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनाचा योग्य विचार केला जाईल, असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी यावेळी दिले.