ETV Bharat / city

Maharashtra Bus : महाराष्ट्रातून परप्रांतात जाणाऱ्या गाड्यांच्या परिस्थितीचा ईटीव्हीने घेतला आढावा - State Transport Corporation

इंदोर मार्गावर नर्मदा नदीत कोसळून बसचा अपघात ( Narmada Bus Accident ) झाल्यानंतर महाराष्ट्रातून परप्रांतात जाणाऱ्या गाड्यांच्या परिस्थितीचा ईटीव्हीने आढावा घेतला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ( State Transport Corporation ) गाड्या सुव्यवस्थेत आहेत का याबाबत अमरावती आगारातील गाड्यांची परिस्थिती ईटीव्हीच्या प्रतिनिधीने जाणून घेतली आहे.

ETV reviewed the condition of trains going from Maharashtra to other provinces
महाराष्ट्रातून परप्रांतात जाणाऱ्या गाड्यांच्या परिस्थितीचा ईटीव्हीने घेतला आढावा
author img

By

Published : Jul 18, 2022, 8:02 PM IST

अमरावती - जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आगाराच्या बसचा इंदोर मार्गावर नर्मदा नदीत कोसळून अपघात ( Narmada Bus Accident ) झाला आहे. महाराष्ट्रातून परप्रांतात जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या ( State Transport Corporation ) गाड्या सुव्यवस्थेत आहेत का याबाबत अमरावती आगारातील गाड्यांची परिस्थिती ईटीव्हीच्या प्रतिनिधीने जाणून घेतली आहे. अमरावती आगारातील अनेक गाड्या या खराब असल्या तरी परप्रांतात जाणाऱ्या सर्वच गाड्यांची स्थिती अतिशय व्यवस्थित असल्याचे ईटीव्हीच्या निदर्शनास आले आहे.

महाराष्ट्रातून परप्रांतात जाणाऱ्या गाड्यांचा आढावा

मध्य प्रदेशातील या शहरांकडे धावतात गाड्या - अमरावती मध्यवर्ती बस स्थानकावरून मध्य प्रदेशातील भोपाळ, खंडवा, मुलताई, बऱ्हाणपूरसाठी गाड्या धावतात. याव्यतिरिक्त नागपूर इंदोर ही नागपूर आगाराची गाडी देखील अमरावती मध्यवर्ती बस स्थानकावरून इंदोरला रवाना होते. मध्य प्रदेशात जाणाऱ्या सर्वच बस गाड्या ह्या सुस्थितीत ठेवल्या जातात. या गाड्यांवर जाणाऱ्या चालकांना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी देखील घेतली जाते. अमरावती आगारात अनेक गाड्यांची अवस्था हवी तशी चांगली नसली तरी परप्रांतात जाणाऱ्या तसेच राज्यातही लांब पल्ल्यावर धावणाऱ्या सर्वच गाड्यांची योग्य निगा राखली जाते, अशी माहिती आगारातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी ईटीव्ही भारत शी बोलताना दिली आहे.

हेही वाचा - Washim Hijab controversy : विद्यार्थिनींने हिजाब घातल्याने परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारला

चालक, प्रवाशांच्या काळजीमुळे हैदराबाद गाडी बंद - अमरावती वरून हैदराबाद साठी नियमित सायंकाळी सहा वाजता अमरावती मध्यवर्ती आगारातून बस सुटायची. कोरोना काळात अमरावती वरून हैदराबादला जाणारी गाडी बंद ठेवण्यात आली ती आजपर्यंत पुन्हा सुरू झाली नाही. या संदर्भात अमरावती आगाराचे प्रमुख जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावती वरून हैदराबादला जाणाऱ्या गाडीचा चालक हा यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे बदलला जातो. मात्र वर्षभरापासून पांढरकवडा आगारातून अमरावती हैदराबाद या गाडीसाठी चालकच उपलब्ध करून दिला गेला नसल्यामुळे अमरावती हैदराबाद या लांब पल्ल्याच्या गाडीवरील चालकाच्या आणि त्याच्यासोबतच गाडीतील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही गाडी सलग अमरावती ते हैदराबाद पर्यंत निर्णय योग्य नाही यामुळेच ही गाडी आताही बंदच असल्याची माहिती आधार व्यवस्थापक जयस्वाल यांनी ईटीव्ही भारतची बोलताना दिली. येणाऱ्या पंधरा दिवसात पांढरकवडा आगारातून अमरावती हैदराबाद या गाडीसाठी चालक मिळण्यासंदर्भात येणारी अडचण सुटण्याच्या मार्गावर असून लवकरच अमरावती वरून हैदराबाद साठी पूर्वीप्रमाणेच प्रवाशांच्या सुविधेत गाडी धावणार असल्याचे जयस्वाल म्हणाले.

खाजगी गाड्यातून जीव मुठीतच घेऊन प्रवास - अमरावती शहरातून मध्य प्रदेशातील इंदोर, बऱ्हाणपूर, बैतूल मुलताई ,इटारसी या शहराकडे अमरावती मध्यवर्ती बस स्थानकासमोरूनच अनेक खाजगी बस तसेच चार चाकी गाड्या धावतात. अमरावती जिल्ह्यातून मध्य प्रदेश ला जाण्यासाठी सातपुड्याची पर्वतरांग घाटांमधून पार करावी लागते खाजगी गाड्यांमधून मध्य प्रदेशातील शहरांकडे प्रवास करताना जीव मुठीतच घेऊन प्रवास करावा लागतो अशी या गडांची अवस्था आहे मात्र याबाबत कोणीही गांभीर्याने लक्ष देत नाही.

दरम्यान, मध्यप्रदेशातील इंदूरहून जळगाव जिल्ह्याच्या अमळनेरकडे जाणारी बस खरगोन येथे नर्मदा नदीत ( Maharashtra Bus Accident ) कोसळली. या भीषण अपघातात वाहनचालक आणि वाहकांसह 13 जणांचा मृत्यू झाला ( Msrtc Bus Fall Into Narmada River 13 Dead ) आहे. या अपघातानंतर मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सरकारकडून बचाव कार्य सुरु आहे. प्रशासनाने बसचा सांगाडा नदीतून बाहेर काढला असून, यातील 8 जणांची ओळख पटली आहे.

धार आणि खरगोन जिल्ह्याच्या सीमेवर नदी - इंदूर-अमळनेर ही बस इंदूर येथून अमळनेरकडे रवाना झाली होती. त्यात सकाळी 10.00 ते 10.30 च्या दरम्यान मध्यप्रदेशातील खलघाट आणि ठिगरीमधील नर्मदा नदीच्या पुलावर सदर बस अपघातग्रस्त होऊन नर्मदा नदीत कोसळली. खरगोन येथे ही बस नर्मदा नदीत कोसळली आहे. हा पूल धार आणि खरगोन जिल्ह्याच्या सीमेवर आहे. या अपघातानंतर तत्काळ बचावकार्य सुरु करण्यात आलं. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. बस नदीत कोसळल्याने चक्काचूर झाली होती.

मुख्यमंत्री शिंदेंची शिवराज सिंह चौहान यांच्याशी चर्चा - या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यांच्याकडून या घटनेसंदर्भात माहिती घेतली. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी याबाबत सांगितले की, इंदूरहून अंमळनेरकडे येणाऱ्या बस अपघाताची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. आम्ही अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या दुःखात सहभागी आहोत. मुख्यमंत्री यासंदर्भात मध्यप्रदेश प्रशासनाशी संपर्क साधून आहेत.

हेही वाचा - ST Bus Accident Maharashtra : महाराष्ट्रात लालपरीचे आत्तापर्यंत झालेले दहा मोठे अपघात!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.