ETV Bharat / city

Ravi Rana on Yashomati Thakur : माझ्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांचे हिशोब चुकते होणार - रवी राणा - ravi rana on maik arrest

अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी कट रचून माझ्या विरोधत षडयंत्र रचल्याचा थेट आरोप केला आहे. माझ्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांचे सर्व हिशोब चुकते होणार असल्याचे आमदार रवी राणा ( Ravi Rana on Yashomati Thakur ) सांगत त्यांनी इशारा दिला आहे.

Ravi Rana
Ravi Rana
author img

By

Published : Feb 24, 2022, 7:10 PM IST

अमरावती - आमदार रवी राणा अखेर महाराष्ट्रात परतले आहेत. मी अमरावतीत नसतानाही अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी कट रचून माझ्या विरोधात षडयंत्र रचल्याचा थेट आरोप केला आहे. माझ्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांचे सर्व हिशोब चुकते होणार असल्याचे आमदार रवी राणा ( Ravi Rana on Yashomati Thakur ) म्हणाले आहे.

रवी राणा माध्यमांशी बोलताना

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी गृहमंत्री आणि पोलिसांना हाताशी धरून माझ्या विरोधात 307 सारखे खोटे गुन्हे दाखल केले. जर महविकास आघाडी खोटे गुन्हा दाखल करून आमदाराला फसवत असल्यास सामान्य जनतेची काय अवस्था होत असेल असा प्रश्न रवी राणांनी उपस्थित केला आहे.

मानहानीचा दावा दाखल करणार
मी दिल्लीत असताना माझ्यावर 307 चा गुन्हा दाखल करतात ही माझी फसवणूक आहे. आज मी दिल्लीतील न्यायालयातून ट्रान्झिट बेल घेऊन राज्यात आलो आहे. खोटा गुन्हा दाखल करणाऱ्यावर मानहानीचा दावा दाखल करणार, असल्याचेही राणा म्हणाले.

अनेक मंत्री ईडीच्या रडारवर
नवाब मलिकनंतर अनेक महाविकास आघाडीतील मंत्री ईडीच्या रडारवर आहेत. अमरावतीच्या पालकमंत्री यांचा 1200 कोटींचा घोटाळा उघडकीस येईल असा दावा रवी राणा यांनी केला आहे.या प्रकरणाचा ईडी त्याचा तपास करत आहे. तर सीएम आणि त्यांच्या अवतीभवती घुटमळणाऱ्या अनिल परब यांचे घोटाळे देखील समोर येतील, असल्याचेही रवी राणा म्हणाले आहे.
हेही वाचा - Narayan Rane on Malik Arrest : देशद्रोही मंत्र्याला कॅबिनेटमध्ये घेणाऱ्या सरकारनेच राजीनामा दिला पाहिजे - नारायण राणे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.