ETV Bharat / city

अमरावतीत स्वस्त धान्य दुकानदार संपावर, निःशुल्क धान्य वाटप थांबले

स्वस्त धान्य वाटप करताना शिधापत्रिका धारकाचा अंगठा ई-पॉस मशीनवर घेतल्यानंतर, दुकानदाराला आपला अंगठा द्यावा लागतो. त्यामुळे दुकानदारांना कोरोना संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे ग्राहकांचे अंगठे न घेता दुकान चालकाच्या अंगठ्यावर धान्य वितरण करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी दुकान चालकांनी केली आहे.

author img

By

Published : May 3, 2021, 8:51 AM IST

अमरावतीत स्वस्त धान्य दुकानदार संपावर, निःशुल्क धान्य वाटप थांबले
अमरावतीत स्वस्त धान्य दुकानदार संपावर, निःशुल्क धान्य वाटप थांबले

अमरावती : राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी विविध मागण्यांसाठी 1 मे पासून संप पुकारला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शिधापत्रिका धारकांचे अंगठ्याचा ठसा न घेता रेशन वाटपाची परवानगी देण्यासह विविध मागण्या या दुकानदारांनी केल्या आहेत.

अमरावतीत स्वस्त धान्य दुकानदार संपावर

म्हणून शिधापत्रिका धारकांचे अंगठे घेऊ नये
कोरोना महामारीच्या काळात अनेक स्वस्त धान्य दुकानदारांचा मृत्यू झाला आहे. स्वस्त धान्य वाटप करताना शिधापत्रिका धारकाचा अंगठा ई-पॉस मशीनवर घेतल्यानंतर, दुकानदाराला आपला अंगठा द्यावा लागतो. त्यामुळे दुकानदारांना कोरोना संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे ग्राहकांचे अंगठे न घेता दुकान चालकाच्या अंगठ्यावर धान्य वितरण करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी दुकान चालकांनी केली आहे. यासह अन्य मागण्याही दुकानदारांनी केल्या आहेत. या मागण्या जोपर्यंत मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत दुकान बंद ठेवणार असल्याचं दुकानदारांचं म्हणणं आहे. त्यामुळे कोरोनाच्या कठीण परिस्थितीमध्ये नागरिकांना निःशुल्क धान्य वाटप कसे केले जाणार हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना आता पडला आहे.

निःशुल्क धान्य वाटप कसे होणार?
दरम्यान, महाराष्ट्रात ब्रेक द चेनचे निर्बंध १५ मेपर्यंत वाढविण्यात आले आहेत. या कालावधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निःशुल्क धान्य वाटप केले जाणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र स्वस्त धान्य दुकानदारांच्या संपामुळे या धान्य वाटपाविषयी आता संभ्रम निर्माण झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.