ETV Bharat / city

Rajapeth Flyover Renaming : अमरावतीच्या राजापेठ पुलाचे नामांतर, आता 'या' नावाने ओळखला जाणार राजापेठ उड्डाण पूल

राजापेठ उड्डाणपुलाचे ( Rajapeth Flyover Renaming ) धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज उड्डाणपूल ( Amravati Sambhaji Maharaj Flyover ) असे नामांतरण करण्यात आले. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे ( Sambhaji Bhide ) यांच्या उपस्थितीत हा नामांतरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

Rajapeth Flyover Renaming
Rajapeth Flyover Renaming
author img

By

Published : Feb 28, 2022, 9:17 PM IST

Updated : Feb 28, 2022, 10:06 PM IST

अमरावती - अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपुलाचे ( Rajapeth Flyover Renaming ) धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज उड्डाणपूल ( Amravati Sambhaji Maharaj Flyover ) असे नामांतरण करण्यात आले. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे ( Sambhaji Bhide ) यांच्या उपस्थितीत हा नामांतरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

राजापेठ उड्डाण पूल

उड्डाणपुलावर आताषबाजी -

अमरावती महापालिकेच्यावतीने राजापेठ उड्डाणपुलाचे आज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज उड्डाणपूल असे नामकरण करण्यात आले. भाजपने श्री शिव प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित या नामांतरण सोहळ्याच्या वेळी उड्डाणपुलावर फटाक्यांची भव्य आतषबाजी करण्यात आली. यावेळी अमरावतीचे महापौर चेतन गावंडे यांच्यासह भाजपचे शहर अध्यक्ष किरण पातुरकर, भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, नगरसेवक प्रणित सोनी, सुरेखा लुंगारे, माजी उपमहापौर संध्या टिकले आदी नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यातून धारकरी या सोहळ्यानिमित्त अमरावतीत आले होते.

ओसवाल भवन येथे संभाजी भिडे यांचे व्याख्यान -

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे संभाजी भिडे यांचे व्याख्यान शहरातील ओसवाल भवन येथे दुपारी आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाला मोठ्या संख्येने तरुणाई उपस्थित होती.

हेही वाचा - Sanjay Pandey Mumbai CP : संजय पांडेनी स्वीकारला मुंबई पोलीस आयुक्तपदाचा पदभार

Last Updated : Feb 28, 2022, 10:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.