ETV Bharat / city

विदर्भात 22 जुलैनंतरच जोरदार पाऊस; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट - जोरदार

हवामान खात्याने 22 जुलैनंतरच विदर्भात पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
author img

By

Published : Jul 16, 2019, 4:55 PM IST

Updated : Jul 16, 2019, 6:09 PM IST

अमरावती - आधीच उशीरा सुरू झालेल्या पावसाने गेल्या दहा दिवसापासून दडी मारली आहे. अशातच आता 22 जुलैनंतरच विदर्भात पुन्हा मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. अमरावतीतील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख अनिल बंड यांनी मंगळवारी हवामानाचा अंदाज वर्तवला आहे.

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपवल्या. महागाचे बियाणे शेतात ओतले. परंतु, गेल्या दहा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या मनात धाकधुक निर्माण झाली आहे. त्यात आणखी हवामान खात्याने 22 जुलैनंतरच विदर्भात पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. अमरावती जिल्ह्यात 95 टक्के पेरण्या झालेल्या आहेत. पाऊस नसल्याने उन्हाचा कडाकाही वाढला आहे. त्यामुळे पिके करपत चालली आहे. शिवाय धरणेही कोरडीच आहे. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे.

अमरावतीच्या हवामान खात्याने विदर्भाचा वर्तविलेला अंदाज -

जुलै महिन्यातील अंदाज पावसाचे स्वरुप
16 व 17 तुरळक पाऊस
18 विखुरलेल्या स्वरूपाचा
19 व 20 हलका मध्यम पाऊस तर काही ठिकाणी जोरदार
21 व 23 विखुरलेला स्वरूपात

Intro: 22 जुलै नंतरच विदर्भात जोरदार पाऊस ,
शेतकऱ्यांची चिंता वाढली

अमरावती अँकर
या वर्षी आधीच उशीरा सुरू झालेल्या पावसाने गेल्या दहा दिवसा पासून दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.अशातच मात्र आता 22 जुलै नंतरच विदर्भात पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे असून 22 तारखे पर्यत काही भागात तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख अनिल बंड यांनी वर्तवला आहे.बेपत्ता पावसाने बळीराजा चिंतेत पडला आहे. कारण पेरणी केलेले बियाने उगवले असल्याने बेपत्ता पाऊस असून त्यात तप्त उन्हाने उगवलेले बि कोमजून जाण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे.

 मागील गेल्या दहा दिवसा पासून अमरावती विभागासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे,अशातच उन्हाचा कडाकाही मोठ्या प्रमाणावर वाढल्याने आता शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.अनेक भागात समाधान कारक पाऊस न पडल्याने पेरण्या थांबल्या आहेत .अमरावती जिल्हात ९५ टक्केच्या वर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत

आज अमरावतीच्या हवामान खात्याने हा अंदाज दिलेला आहे

16,17: तुरळक ठिकाणी

18:  विखुरलेल्या स्वरूपात

19,20 :  विदर्भात बरेच ठिकाणी हलका मध्यम पाऊस। ।

तुरळक ठिकाणी जोरदार .

21-23:  विखुरलेला स्वरूपातBody:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Jul 16, 2019, 6:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.