ETV Bharat / city

19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा स्थापन होणारच, राणा दाम्पत्याचा निर्धार - शिवाजी महाराज पुतळा नवनीत राणा प्रतिक्रिया

आता काहीही झाले तरी, 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी शिवरायांचा पुतळा पुन्हा एकदा राजापेठ पुलावर स्थापन ( shivaji maharaj Statue on Rajapeth flyover ) केला जाणार, असे राणा ( Navneet Rana talk on shivaji maharaj Statue ) दाम्पत्यांनी 'ईटीव्ही भरात'शी बोलताना स्पष्ट केले.

Navneet Rana talk on shivaji maharaj Statue
शिवाजी महाराज पुतळा राजपेठ पूल
author img

By

Published : Jan 16, 2022, 6:05 PM IST

Updated : Jan 16, 2022, 6:57 PM IST

अमरावती - राज्यात शिवसेनेचे सरकार असतानाही आम्ही राजापेठ उड्डाणपुलावर ( shivaji maharaj Statue on Rajapeth flyover ) बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला आहे. या प्रकाराचा आम्ही निषेध नोंदवतो. आता काहीही झाले तरी, 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी शिवरायांचा पुतळा पुन्हा एकदा राजापेठ पुलावर स्थापन केला जाणार, असे राणा ( Navneet Rana talk on shivaji maharaj Statue ) दाम्पत्यांनी 'ईटीव्ही भरात'शी बोलताना स्पष्ट केले.

राणा दाम्पत्यशी चर्चा करतना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा - Amravati Shivaji Maharaj Statue Removed : बाळासाहेबांचा आदर्श कुठे हरवला? खासदार नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना सवाल

युवा स्वाभिमानचे नगरसेवक देणार राजीनामा

राजापेठ उड्डाणपुलावर ( Rajapeth flyover ) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्या संदर्भात आम्ही महापालिका प्रशासनाकडे विनंती केली होती. विशेष म्हणजे, यासाठी विशेष सभा घ्यावी, अशी मागणी आमच्या वतीने करण्यात आली होती. असे असताना आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाची स्थापना आम्ही केल्यावर हजारो शिवप्रेमी छत्रपतींच्या पुतळ्याला नतमस्तक होण्यासाठी राजापेठ उड्डाणपुलावर आलेत. चार दिवस छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती उड्डाणपुलावर झाली असताना आज पहाटे महापालिका प्रशासनाने केलेली कारवाई अतिशय निंदनीय आहे. महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ आमच्या युवा स्वाभिमान संघटनेचे तीनही नगरसेवक उद्या राजीनामा देतील, असे आमदार रवी राणा म्हणाले.

भाजपचा केला निषेध

अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता आहे, असे असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविणे यासंदर्भात महापालिका प्रशासनाच्या वतीने परवानगी देण्यास नकार देणे, तसेच आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महापालिका प्रशासनाच्या वतीने हटवण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाबाबत स्थानिक भाजप नेत्यांचा मी निषेध नोंदवतो, असेही आमदार रवी राणा म्हणाले.

आम्ही अतिरेकी नाही

आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहोत. राजापेठ उड्डाणपुलावर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणे हा गुन्हा नाही. मात्र, आमच्या कृत्यासाठी आज आम्हाला पोलिसांनी घरातच स्थानबद्द केले आहे. आम्ही अतिरेकी नाही तर, शिवभक्त आहोत. राज्यात शिवसेनेचे सरकार असतानाही असा प्रकार घडत असेल तर, आम्ही या सरकारचा निषेध नोंदवतो. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजापेठ उड्डाणपुलावर पुन्हा बसविला जाणार आहे. यापूर्वीच महापालिका प्रशासनाने परवानगीच्या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण कराव्या, असे खासदार नवनीत राणा म्हणाल्या.

हेही वाचा - Amaravati Vaccination : पहिल्या लसीकरणात हात बधिर, तर दुसऱ्या डोसमध्ये निकामी होण्याचा दावा..

Last Updated : Jan 16, 2022, 6:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.