अमरावती - नुपूर शर्माच्या समर्थनात पोस्ट शेअर करणाऱ्या राजस्थानच्या उदयपूर येथील कन्हैयालालची हत्या होणार हे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना आधीच माहिती होते. असा, खळबजावक आरोप आज काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. कन्हैयालालची हत्या 28 जूनला झाली असताना या संदर्भात खासदार नवनीत राणा यांनी गृहमंत्री अमित शहा यांना 27 जून रोजी या हत्तेबाबत पत्राद्वारे कळविले होते. असे, देखील काँग्रेसच्या वतीने आज आयोजित पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे.
यशोमती ठाकूर म्हणतात राणा दाम्पत्याची व्हावी चौकशी - अमरावती शहरात 21 जून रोजी उमेश कोल्हे हत्या प्रकरणानंतर जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी अमित शहा यांना 26 जून रोजी पत्र लिहून अमरावती घडलेल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा संबंध उदयपूर येथील कन्हैयालाल यांच्या हत्या प्रकरणाशी असल्याबाबतचा उल्लेख केला आहे. वास्तवात उदयपूरमध्ये कन्हैयालालची हत्या 28 जूनला झाली असताना त्याच्या एक दिवस आधीच खासदार नवनीत राणा यांनी कन्हैयालाल यांच्या हत्येबाबत 27 जूनच्या पत्रातच कसा काय उल्लेख केला असा सवाल जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला. उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इरफान खान हा राणा यांचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले असून उमेश कोल्हे हत्या प्रकरणात खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांची देखील एनआयएनए चौकशी करावी अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा केला जातो आहे इव्हेंट - अमरावती शहरातील औषधी विक्रेते उमेश कोल्हे यांची हत्या होणे ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. ही घटना घडली तेव्हा राज्यात राजकीय अस्थिरता असली तरी मी स्वतः आणि अमरावती शहरातील आमचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांनी उमेश कोल्हे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मात्र, याचा गाजावाजा करणे आम्हाला पटणारे नव्हते. मात्र, जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्यासह भाजपच्या स्थानिक नेत्यांनी उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा एखाद्या इव्हेंट प्रमाणे वापर करणे हे अतिशय क्लेशदायक आहे. आता तर स्वतः उमेश कोल्हे यांची कुटुंबीय देखील आमच्या दुःखाचा बाजार मांडू नका. अशी, हात जोडून या सगळ्यांना विनंती करीत असल्याचे यशोमती ठाकूर म्हणाला.
यशोमती ठाकूर यांचा भाजपवर आरोप - 2020 मध्ये जम्मू काश्मीर येथे दहशतवाद्यांना हत्यारे पुरविण्याचा आरोप असलेला भाजपचा नेता तथा सरपंच तारीख अहमद याला अटक करण्यात आली होती. तारीख अहमदवर हिजबुल कमांडर नावेद बाबू याला हत्यारे पुरविण्याचा आरोप होता. जो दहशतवाद्यांना मदत करणारा डीएसपी देवेंद्र सिंग यांच्यासोबत त्याला अटक झाली होती. एनआयएनए तर स्पष्टपणे तारीख अहमद हा देवेंद्रसिंग याचा साथीदार होता. असे, सांगितले होते. जर, देवेंद्र सिंगच्या केसची व्यवस्थित चौकशी केली असती तर, तथ्य समोर आले असते. मात्र, ही संपूर्ण चौकशी मधातच थांबविली गेली, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.
2017 मध्ये मध्य प्रदेशमध्ये एटीएसच्या टीमने अवैध टेलिफोन एक्सचेंजचा पर्दाफाश करत आयएसआयच्या 11 संशयितांना अटक केली होती. यामध्ये एक बीजेपी आयटी सेलचा सदस्य ध्रुव सक्सेना सुद्धा होता. ज्याची राज्याचे मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांच्यासोबत छायाचित्र देखील समोर आलेली आहेत. यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच 2019 मध्ये मध्य प्रदेशमध्येच टेरर फंडिंगचे आरोप असलेला बजरंग दलचा नेता बलराम सिंग याला देखील अटक करण्यात आली होती. 2017 मध्ये आसामचा भाजप नेता निरंजन होजाई यांच्यावर एनआयएच्या विशेष न्यायालयात दहशतवाद्यांना आर्थिक मदत करण्याचे आरोप सिद्ध झाले.
तसेच त्याला या कृत्यासाठी जन्मठेपेची शिक्षा देखील फुटवण्यात आली यामध्ये त्याला एक हजार कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळ्याच्या टेरर फंडिंगच्या केसमध्ये दोषी ठरविण्यात आले होते. अशाच प्रकारे जम्मू काश्मीरमध्ये गावकऱ्यांकडून पकडण्यात आलेला लष्करे तोयबाच्या दोन दहशतवाद्यांमधील एक तालिब हुसेन शहा हा देखील भाजपचा पदाधिकारी होता. हे विविध अहवालांमधून सिद्ध झाले आहे. त्याचे विविध भाजप नेत्यांसोबत तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहा सोबत असलेले छायाचित्र समोर आले आहेत. जेव्हा तो पकडला गेला तेव्हा त्याची पवित्र अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याची योजना होती. हे देखील सिद्ध झाले असल्याचे यशोमती ठाकूर म्हणाल्या.
अमरावतीला दहशतवाद्यांची प्रयोगशाळा होऊ देणार नाही - अमरावती ही दहशतवाद्यांची प्रयोगशाळा होते आहे. असा भाजपचा आरोप आहे. मात्र, या आरोपात कुठलेही तथ्य नाही. खरंतर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी, लोकप्रतिनिधींनी जिल्ह्याच्या विकासाची भाषा बोलावी. त्या दृष्टीने प्रयत्न करावेत मात्र, अमरावती या उलट होते आहे. डॉक्टर सुनील देशमुख यांनी वीस वर्षांपूर्वी अमरावतीच्या विकासासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांमुळे आज अमरावतीत उद्योग यायला लागले आहे. आमच्या प्रयत्नांमुळे आज अमरावती एमआयडीसीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण उद्योग सुरू होत आहे. आता अमरावतीला दहशतवाद्यांची प्रयोगशाळा म्हणून आपल्याच शहराची बदनामी करणे चुकीचे असल्याचे यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या.
पत्रकार परिषदेला जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता दिलीप एडतकर, माजी महापौर मिलिंद चिमोटे , विलास इंगोले आदी उपस्थित होते.
हेही वाचा - Sextortion Case : सेक्सटॉर्शनसाठी पत्नीचा वापर; अधिकाऱ्याला मागितली एक कोटीची खंडणी, २८ लाख घेताना आरोपी रंगेहात पकडला