ETV Bharat / city

संजय राऊत यांच्याबाबत आमची कुठलीच नाराज नाही : खासदार सुप्रिया सुळे - संजय राऊत

राज्यसभा निवडणुकीदरम्यान खासदार संजय राऊत यांनी काही आमदारांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. मात्र, त्यामध्ये काही एक तथ्य नाही. नुकतेच खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) आणि आमदार देवेंद्र भुयार यांची भेट झाली. राऊत यांच्याबाबत आमची कुठलीच नाराजी नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule ) यांनी अमरावती श्री अंबादेवी आणि एकवीरा देवीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे
author img

By

Published : Jun 14, 2022, 1:14 PM IST

अमरावती - राज्यसभा निवडणुकीदरम्यान खासदार संजय राऊत यांनी काही आमदारांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. मात्र, त्यामध्ये काही एक तथ्य नाही. नुकतेच खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) आणि आमदार देवेंद्र भुयार यांची भेट झाली. राऊत यांच्याबाबत आमची कुठलीच नाराजी नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule ) यांनी अमरावती श्री अंबादेवी आणि एकवीरा देवीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

बोलताना खासदार सुप्रिया सुळे

साकडे घालण्यासाठी दर्शनाला आले नाही - सध्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या नावाची राष्ट्रपती निवडणुकीसाठी चर्चा आहे. मात्र, मी आज अमरावतीला अंबादेवीच्या मंदिरात केवळ दर्शनासाठी आले आहे. कुठलेही साकडे घालण्यासाठी मी मंदिरात आले नाही. मी मंदिरात देवाला कुठेच काही मागणे घालत नाही तर नेहमीच देवाला आभार मानण्यासाठी मंदिरात येते, असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

तर पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत - देशातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम लागत असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तरुणांना चांगल्या नोकऱ्या मिळवून देत असतील तर त्यांच्या निर्णयाचे आणि धोरणाचे आम्ही स्वागतच करू, असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अशी आहे राष्ट्रपती निवडीची प्रक्रिया - राष्ट्रपतीपदासाठी ( Presidential Election 2022 ) 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संसद सदस्य (राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही) आणि राज्य विधानसभेचे सदस्य हे मतदार असतात. एकूण खासदारांची संख्या 776 आहे (राज्यसभा 233 लोकसभा 543) प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य 708 आहे. आमदारांच्या बाबतीत देशभरात एकूण 4 हजार 120 मते आहेत.

हेही वाचा - Zilla Parishad School of Amravati : अमरावतीच्या जिल्हा परिषद शाळा पुन्हा भरणार गळणाऱ्या छताखालीच; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.