ETV Bharat / city

Vedanta Foxconn issue : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प प्रकरणात आता खासदार राणांची उडी - Vedanta Foxconn

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प ( Vedanta Foxconn project ) प्रकरणात आता खासदार नवनीत राणा यांनी उडी घेतली आहे. वेळेत पाठपुरावा केला नाही त्यामुळेच तो प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला असून हा आमच्या सर्वांसाठी धक्का आहे. मागच्या सरकारमुळेच काय हा प्रकल्प येथून तिथे हलविण्यात आल्याचेही नवनीत राणा यांनी सांगून त्यांनी अप्रत्यक्षरित्या विद्यमान एकनाथ पाठराखणच केली आहे. ( MP Rana entry in the Vedanta Foxconn project case )

MP Rana
खासदार राणा
author img

By

Published : Sep 16, 2022, 1:36 PM IST

अमरावती : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प प्रकरणात आता खासदार नवनीत राणा यांनी उडी घेतली आहे. तसेच शिंदे-फडणवीस सरकारची ( Shinde- Devendra Fadnavis government ) पाठराखण केली आहे. नवनीत राणा ( MP navneet Rana )म्हणाल्या की, मागच्या सरकारने पाठपुरावा न केल्याने प्रकल्प गुजरातला गेला. एवढा मोठा प्रकल्प राज्यात आणण्यासाठी माविआ सरकारने काहीही प्रयत्न केले नाही. त्यासाठी आवश्यक असलेला पाठपुरावा आधीच्या सरकारने केला नाही.

का गेला प्रकल्प दुसऱ्या राज्यात : वेळेत पाठपुरावा केला नाही त्यामुळेच तो प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला असून हा आमच्या सर्वांसाठी धक्का आहे. मागच्या सरकारमुळेच काय हा प्रकल्प येथून तिथे हलविण्यात आल्याचेही नवनीत राणा यांनी सांगून त्यांनी अप्रत्यक्षरित्या विद्यमान एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारची पाठराखणच केली आहे.

काय होता प्रकल्प - भारतात सुरू असलेल्या ऑटोमोबाईल आणि स्मार्टफोन उद्योगांमध्ये अत्याधुनिक अशा सेमीकंडक्टरचा वापर केला जातो. मात्र, सध्या भारतात या सेमी कंडक्टरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतातच सेमीकंडक्टर तयार व्हावेत. यासाठी हा प्रकल्प महाराष्ट्रात पुण्याजवळ उभारण्यात येणार होता (Vedanta Foxconn). यासंदर्भात तत्कालीन महाराष्ट्र सरकारने अनेक बैठका घेतल्या होत्या. तैवानमधील फॉक्सकॉन आणि खनिकर्म क्षेत्रातील वेदांता या कंपन्यांनी संयुक्तपणे महाराष्ट्रात सेमी कंडक्टर प्लांट उभा करण्याचा निर्णय घेतला होता. आता हा प्रकल्प गुजरातमध्ये होणार आहे.

शिंदे फडणवीस यांचीही वेदांतबरोबर बैठक - तैवानमधील फॉक्सकॉन आणि भारतामधील वेदांता समूहाबरोबर सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यासंदर्भात शिंदे फडणवीस यांचीही एक बैठक सत्ता आल्यानंतर झाली होती. या बैठकीसंदर्भात एमआयडीसीने (midc) आपल्या ट्विटर हँडल वरून 26 जुलै 2022 रोजी बैठक पार पडल्याची आणि महाराष्ट्रात आता लवकरच लाखापेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार असल्याचे म्हटले होते.

वेदांत प्रकल्पाचा असा झाला प्रवास - वेदांता ग्रुपचा सेमीकंडक्टर व डीस्पले फॅब्रीकेशनचा तळेगांव येथे येणारा प्रकल्प गुजरात येथे नेण्यात आला आहे. वेदांता व तेवॉन येथील फॉक्सकॉन या कंपनीचे ६०:४० असे जॉईन्ट व्हेंचर झाले आहे. सर्वसाधारणपणे २ लाख कोटींची गुंतवणूक व अंदाजे १.५ लाख रोजगार निर्माण करणारा हा प्रकल्प उभारणीसाठी या कंपनीने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलगांणा व आंध्र प्रदेश या राज्याबरोबर चर्चा केली. जागा निवडीसाठी एकूण १०० मुद्दांचा विचार केला. त्यांनी तळेगाव टप्पा ४ ही जागा अंतिम केली. तळेगाव येथील त्यांना आवश्यक असणारे इकोसिस्टिम, ऑटोमोबाईल व इलेक्ट्रीक हब, रस्ते , रेल्वे व एअर कनेक्टीव्हिटी, जेएनपीटीशी असणारी कनेक्टीव्हिटी, उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ व महाराष्ट्र राज्याचे गुंतवणूक धोरण हे पोषक असल्याने त्यांनी तळेगाव येथील १ हजार एकर जागेची निवड केली होती. वेदांताच्या वरीष्ठ टीमने सर्व बाबींचा विचार करुन तळेगाव हेच ठिकाण योग्य असल्याचे सुचविले होते. मात्र आता हा पोकळ इतिहास झाला आहे. हा प्रकल्प आता गुजरातमध्ये होणार आहे.

हे तर माविआ चे अपयश : वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प परराज्यात जाणे हे तर मागील महाविकास आघाडी सरकारचे अपयश असल्याची माहिती खासदार नवनीत राणा यांनी दिली. सरकारने योग्य पाठपुरावा केला असता तर तो प्रकल्प महाराष्ट्रातच राहिला असता आणि लाखो लोकांना रोजगार मिळाला असता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.