अमरावती - एका सार्वजनिक कार्यक्रमात महाविकास आघाडीतील मंत्री व शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील ( Gulabrao Patil statement On Hema Malini ) यांनी जळगाव शहरातील रस्त्यांना खासदार हेमामालिनी यांच्या गालाची उपमा देत 'हे रस्ते आम्ही हेमामालिनीच्या गाला सारखी चिकणे केले', असे धक्कादायक विधान केले होते. यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( Navneet Rana Critisize Gulabrao Patil ) यांनी संतप्त प्रतिक्रिया देत मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. गुलाबराव पाटील यांना बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या सुसंस्कृतपणाचा विसर पडला असून त्यांनी हे विधान मागे घेऊन तत्काळ माफी मागावी, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी दिली आहे.
काय म्हणाल्या नवनीत राणा -
काल एका कार्यक्रमात बोलताना, आपण जळगावातील रस्ते हेमा मालिनीच्या गालाप्रमाणे केले, असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले होते. यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी गुबालराव पाटील आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. गुलाबरावांचे वक्तव्य ज्येष्ठ खासदार हेमामालिनी व समस्त महिला वर्गाचा अपमान करणारे असल्याचे नवनीत राणा यांनी म्हटले आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यकर्तृत्वाचा व धोरणाचा हा अपमान असून गुलाबराव पाटील यांनी या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल खासदार हेमामालिनी व समस्त महिला वर्गाची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही नवनीत राणा यांनी केली. तसेच माफी न मागितल्यास युवा स्वाभिमान महिला आघाडी आघाडीच्यावतीने गुलाबराव पाटील यांना धडा शिकवू, असा इशाराही त्यांनी दिली.
हेही वाचा - Amit Shah on Uddhav Thackeray :..तर राजीनामा द्या अन् मैदानात उतरा, अमित शाह यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान