ETV Bharat / city

MP Navneet Rana लव्ह जिहाद प्रकरणावरुन नवनीत राणा यांचा पोलीस स्टेशनमध्ये राडा - अमरावतीच्या पोलीस स्टेशन

खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आंतरधर्मीय विवाह प्रकरणावरुन ( Navneet Rana aggressive over interfaith marriage case) आक्रमक झाल्या आहेत. अमरावतीच्या पोलीस स्टेशनमध्ये (Amravati Police Station) जावून त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली आहे. लग्नानंतर मुलींना डांबून ठेवल्याचा आरोप मुलींच्या नातेवाईकांनी केला आहे.

MP Navneet Rana
नवनीत राणा
author img

By

Published : Sep 7, 2022, 12:53 PM IST

Updated : Sep 7, 2022, 1:37 PM IST

अमरावती: खासदार नवनीत राणा आंतरधर्मीय विवाह प्रकरणावरुन MP Navneet Rana aggressive over interfaith marriage case आक्रमक झाल्या आहेत. अमरावतीच्या पोलीस स्टेशनमध्ये जावून त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली आहे. लग्नानंतर मुलींना डांबून ठेवल्याचा आरोप मुलींच्या नातेवाईकांनी केला आहे. त्या मुलीला समोर आणा, माझा फोन तुम्ही कोणाच्या सांगण्यावरुन टॅप केला असे म्हणत खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्या त्यांनी काही वेळ पोलीस ठाण्यात ठाण मांडुन पोलीसांशी हुज्जत घातली.

अमरावतीत सध्या लव्ह जिहादचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. एका मुलीला पळवून तीचा आंतरधर्मीय विवाह केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर नवनीत राणा यांनी (Navneet Rana) हिंदू संघटनेच्या काही कार्यकर्त्यांसह थेट राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि मुलीला समोर आणण्याची मागणी करत पोलीसांशी हुज्जत घालायला सुरवात केली. या प्रकारानंतर अमरावतीत आणखी एक आंतरधर्मीय विवाह प्रकरण गाजायला सुरवात झाली आहे.

नवनीत राणा यांनी म्हटले आहे की, पतीने मुलीला डांबून ठेवल्याची तक्रार घेऊन मुलीचे पालक माझ्याकडे आले. मात्र मी फोन केल्यावर पोलिसांनी माझा फोन रेकॉर्ड केला, तुम्हाला माझा कॉल रेकॉर्ड करायचा अधिकार कोणी दिला. असा सवाल करत त्या अमरावती पोलिस ठाण्यात धडकल्या. यादरम्यान पोलिस आणि नवनीत राणा यांच्यात वाद निर्माण झाला. सध्या या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले तसेच पोलीस ठाण्याच्या परीसरात संख्येने गर्दी झाली.

राणा यांनी नंतर स्पष्ट केले आहे की, अमरावतीची बदनामी का होत आहे. 19 वर्षांची हिंदू मुलगी आहे. त्या मुलाला पकडून आणले आहे. रात्रीपासून चौकशी करत आहेत, मात्र काही समोर येत नाही. मात्र मुलगी कुठे आहे याबाबत उत्तरे दिली जात नाहीयेत. त्या मुलाच्या परिवाराला इथे पकडून आणा, एका तासात सगळे बाहेर येईल. दोन तासांत मुलीचा शोध घ्या, असा अल्टिमेटम त्यांनी दिला आहे. या मुलांचा एक समूह आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

Last Updated : Sep 7, 2022, 1:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.