अमरावती - विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथील हिंसाचारग्रस्त भागाला भेट दिल्यामुळे जळफळाट झालेल्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी फडणवीस यांच्या दौऱ्यावर टीका केली आहे. अमरावती मधील वातावरण फडणवीस यांच्या दौऱ्यामुळे अधिक खराब होऊ शकते वगैरे तारे यशोमतींनी तोडले आहेत. मुळात ठाकूर यांच्या तुष्टीकरणामुळेच अमरावती जिल्ह्यातील शांतता भंग झाली आहे, अशी टीका भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी केली आहे.
अमरावती हिंसाचार पूर्वनियोजित होता, अशी माहिती ठाकूर यांनी प्रसारमध्यमाना दिली होती. त्यावर पोलिसांनी स्पष्टीकरण दिले असून अमरावती मधील हिंसाचार पूर्वनियोजित नव्हता असे म्हटले आहे. ठाकूर व प्रशासनाने हिंसाचार पूर्वनियोजित किंवा कसा हे प्रथम ठरवावे. मुळात यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया देताना पूर्ण माहिती प्रशासनाकडून घेऊन द्यावी. जेणेकरून अमरावती जिल्ह्यातील शांतता बिघडणार नाही. पोलिसांच्या वतीने यशोमती ठाकुरांचा सांगण्यावरून त्रास देणे सुरू आहे, जाणीवपूर्वक खोट्या केसेस दाखल करणे सुरू आहे. असले धंदे ठाकूर यांनी बंद करावेत, मग देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावर टीका करावी, असे निवेदिता चौधरी यांनी म्हटले आहे.
मंत्री यशोमती ठाकूर यांच्यामुळेच जिल्ह्यातील शांतता भंग - भाजप जिल्हाध्यक्ष - अमरावती हिंसाचार
फडणवीस यांच्या दौऱ्यावर टीका केली आहे. अमरावती मधील वातावरण फडणवीस यांच्या दौऱ्यामुळे अधिक खराब होऊ शकते वगैरे तारे यशोमतींनी तोडले आहेत. मुळात ठाकूर यांच्या तुष्टीकरणामुळेच अमरावती जिल्ह्यातील शांतता भंग झाली आहे, अशी टीका भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी केली आहे.