ETV Bharat / city

Amravati ShivSmarak : अमरावतीत साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, छत्री तलावावर पार पडले जलपूजन

अमरावती शहरातील छत्री तलाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे ( Chhatri Talao Shivaji Maharaj Smarak ) स्मारक साकारले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या आमसभेत पारित झाला असून आज महापौर चेतन गावंडे ( Amravati Mayor Chetan Gawande ) यांच्यासह भाजपचे अध्यक्ष किरण पातुरकर ( Kiran Paturkar ) आणि माजी शहराध्यक्ष तुषार भारतीय ( Tushar Bharitiya ) उपस्थित होते.

author img

By

Published : Feb 19, 2022, 7:45 PM IST

Updated : Feb 19, 2022, 8:06 PM IST

Amravati ShivSmarak Jalpujan
Amravati ShivSmarak Jalpujan

अमरावती - अमरावती शहरातील छत्री तलाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे ( Chhatri Talao Shivaji Maharaj Smarak ) स्मारक साकारले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या आमसभेत पारित झाला असून आज महापौर चेतन गावंडे ( Amravati Mayor Chetan Gawande ) यांच्यासह भाजपचे अध्यक्ष किरण पातुरकर ( Kiran Paturkar ) आणि माजी शहराध्यक्ष तुषार भारतीय ( Tushar Bharitiya ) व सभागृह नेते सुनील काळे यांच्या हस्ते जलपूजन आणि शिवरायांना अभिषेक करण्यात आला.

प्रतिक्रिया

तलावावर छत्री होती आता छत्रपतीही येणार -

छत्री तलाव येथे शिवाजी महाराजांचे स्मारक उभारले जाणार असून यासाठी लागणारा निधी अपुरा पडणार नाही. गरज पडल्यास आम्ही केंद्राकडून निधी आणू, असे भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि नगरसेवक तुषार भारतीय म्हणाले. तुषार भारतीय यांनी छत्री तलावावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक साकारले जावे, यासाठी महापालिकेच्या आमसभेत प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर झाला. छत्री तलावावर ब्रिटीश काळापासून छत्री होती. मात्र, आता या छत्री सोबतच छत्रपतींचे स्मारक साकारले जाणार आहे. सोमवारपासूनच छत्री तलावावर शिवछत्रपतींचे स्मारक साकारण्याचे काम सुरु होणार, असे तुषार भारतीय म्हणाले.

पुढच्या शिवजयंतीला स्मारकाचे काम होणार पूर्ण -

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक छत्री तलावावर साकारण्यासाठी महापालिकेकडून पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार, असे महापौर चेतन गावंडे म्हणाले. तुषार भारतीय यांनी या स्मारकासाठी मांडलेल्या प्रस्तावाला सभागृहाने एकमताने मंजुरी दिली आहे. सोमवारी महापालिका आयुक्तांसह महापालिकेचे अधिकारी आणि मी या परिसराची पाहणी करणार आहे. स्मारकाचे काम लवकरच सुरु होणार असून पुढच्या शिवजयंतीला छत्री तालावर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आकारले जाईल, असे महापौर चेतन गावंडे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - Amravati Student Make Sword : विद्यार्थ्यांचे 'शिवप्रेम'; तलवारीवर साकारली शिवसृष्टी

Last Updated : Feb 19, 2022, 8:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.