अमरावती अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांच्या विरोधात दाखल असणाऱ्या सर्व गुन्ह्यांचा तपास सीआयडीकडे वळविण्यात (transferring investigation of crimes to CID)आला आहे. गृहमंत्रालयाने (Ministry of Home Affairs) राणा दाम्पत्याविरोधातील असलेल्या सर्व गुन्ह्यांचा तपास सीआयडीकडे वळता करावा, असे आदेश अमरावतीच्या पोलिस आयुक्तांना दिले आहेत. दाखल असलेल्या सर्व गुन्ह्यांचा तपास सीआयडी करणार असून या तपासात अनेक सत्यं बाहेर येतील, असा दावा आ. रवी राणा यांनी केला आहे.
या प्रकरणात दाखल आहेत गुन्हे (Cases filed against Rana couple) दोन वर्षांपूर्वी दिवाळीमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी आंदोलन केले होते. त्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. राजापेठ पुलावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी बसवला होता. हा पुतळा महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी मध्यरात्री काढून टाकल्यावर त्यांच्यावर राणा समर्थकांनी शाही फेकली होती. या प्रकरणात देखील आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हे दाखल आहे. यासह दिल्ली पब्लिक स्कूल या शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संपूर्ण गुन्ह्याचा तपास अमरावती पोलीस करीत असताना, आता हा संपूर्ण तपास गृहमंत्रालयाने सीआयडीकडे (cid) वळता केला असल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी 'ईटीव्ही भारत' (etv bharat) शी बोलताना दिली.
पोलीस आयुक्तांवर होणार कारवाई अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. मात्र, अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह (Commissioner of Police Aarti Singh) या केवळ भ्रष्टाचार करण्यात व्यस्त आहेत. आता आमच्यावर दाखल केलेल्या सर्व गुन्ह्यांचा तपास सीआयडी करणार असून या तपासात अनेक सत्य बाहेर आल्यावर पोलीस आयुक्तांवर देखील कारवाई होईल. राजापेठचे भ्रष्ट पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्यावर देखील कारवाई होईल असे आमदार रवी राणा म्हणाले.