अमरावती - शहरातील वडाळी हा तसा मागासलेला परिसर म्हणून ओळखला जातो. मात्र या परिसरात आपल्या वेदना एकमेकींना सांगत योगा योगाने तीस-ते चाळीस महिला एकत्र आल्या. सलग सात वर्षे झाली योगाच्या माध्यमातून यापैकी अनेकींच्या बऱ्याच अडचणी लुप्त झाल्या. आज दिवस निघाला की पाहिले योगा मग सारे काही असाच दिनक्रम या महिलांचा आहे.
वडाळी उद्यानातून सुरू झाला योगा..
शहरातील वडाळी तालावलागत असणाऱ्या वडाळी उद्यानात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कर्मचारी असणारे विनोद बाभुळकर यांनी 2008 मध्ये सर्वात आधी निशुल्क योगा प्रशिक्षणाला सुरुवात केली. त्यावेळी परिसरातील अनेक पुरुष आणि महिला या योग प्रशिक्षणाला जायच्या. यापैकी एक असणाऱ्या मीना राजूरकर या सातत्याने प्रशिक्षणाला उपस्थित होत्या. 2012 पर्यंत त्यांनी योगाचे संपूर्ण धडे घेतले. आणि वडाळी उद्यानात 2012 त्या स्वतः योगा प्रशिक्षक म्हणून प्रशिक्षण द्यायला लागल्या.
2014 पासून महिलांच्या योग केंद्राला सुरुवात..
वडाळी उद्यनात योगाचे प्रशिक्षण देताना माकडांचा त्रास व्हायचा. तसेच पावसाळ्यात योगा वर्ग बंद पडत असत. निःशुल्क चालणाऱ्या योगा वर्गासाठी वडाळी परिसरातील श्री इंद्राशेष महाराज देवस्थान संचालक मंडळाने मंदिराच्या भक्त निवासातील वरच्या मजल्यावर असणारे सभागृह 2014 मध्ये योग केंद्रासाठी उपलब्ध करून दिले. आज सात वर्षांपासून पहाटे 5 ते सकळी 6.30 वाजेपर्यंत याठिकाणी महिला योगाचे प्रशिक्षण घेतात.
दोघींपासून झाली सुरुवात..
2014 मध्ये सुरुवातीला मीना राजूरकर आणि छाया पाचपोर या दोघीच योगा करायच्या. आता उद्यानात चकणारा योग वर्ग परिसरातील सभागृहात सुरू झाल्याने दर आठवडयाला नवी महिला जुळत गेली. आज या केंद्रात 30 ते 35 माहिल रोज योगा करायला येत आहे. योगामुळे अनेक महिलांना लाभ होतो आहे. काही महिलांचा थायरॉईडचा त्रास योगामुळे नाहीसा झाला तर काहींच्या गुडग्याचा त्रास बंद झाला आल्याचे प्रशिक्षण वर्गाला येणाऱ्या महिलांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.